Share

आदित्य ठाकरे ड्रग्स घेतात; दिशा सालियन प्रकरणी नार्कोटिक्सकडे चॅट्स असल्याचा नितेश राणेंचा गंभीर आरोप

भाजप नेते नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर ड्रग्स घेतल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. दिशा सालियन प्रकरणी नार्कोटिक्सकडे याबाबतचे चॅट्स असल्याचा दावा त्यांनी केला.

Published On: 

Nitesh Rane making allegations against Aditya Thackeray

प्रतिनिधी, 12 ऑक्टोबर: भाजप नेते आणि राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर ड्रग्स सेवनाचा अत्यंत गंभीर आरोप केला आहे. दिशा सालियन प्रकरणात नार्कोटिक्स विभागाकडे आदित्य ठाकरे ड्रग्स घेत असल्याबाबतचे काही चॅट्स उपलब्ध असल्याचा खळबळजनक दावा राणे यांनी केला आहे.

आदित्य आणि अमित ठाकरे यांनी काल केलेल्या आंदोलनावर टीका करण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत राणे बोलत होते. काल आदित्य ठाकरे पोलिसांच्या व्हॅनवर उभे राहून ओरडत होते, त्यावर निशाणा साधताना राणे म्हणाले की, कदाचित काल त्यांनी जास्त जोरात ओढलं असेल आणि त्याचाच प्रभाव कालच्या आंदोलनात दिसत होता. काल पेंग्विन उगाच कशाला उड्या मारत होता, हे समजले असते. जर पोलिसांनी त्यांची ड्रग्स टेस्ट केली असती तर सत्य समोर आले असते, असेही ते (Nitesh Rane) म्हणाले.

यावेळी त्यांनी अमित ठाकरे यांनाही सावध राहण्याचा सल्ला दिला. आदित्य ठाकरेंच्या मांडीला मांडी लावून कमी बसा, कारण त्यांच्या संगतीचा परिणाम कालच्या आंदोलनात दिसत होता, आदित्य ठाकरे काल जास्तच मारून आल्याचे दिसत होते, असा दावा नितेश राणे यांनी केला.

बाळासाहेब ठाकरे यांनी रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरांना महाराष्ट्रात पाय ठेवू न देण्याची कठोर भूमिका घेतली होती, याची आठवण करून देत राणे यांनी दोन्ही ठाकरेंवर टीका केली. आताचे हे ‘वाकरे’ मतदार यादीत बांगलादेशी आणि रोहिंग्यांची नावे राहावीत आणि ‘व्होट जिहाद’च्या माध्यमातून आपले खासदार निवडून यावेत यासाठी झटत आहेत. मोहल्ल्यांमधून त्यांना ५० ते ७० टक्के मतदान झाले असून, प्रेमात पडून त्यांनी बाळासाहेबांचे विचार रसातळाला नेल्याचा घणाघात राणे यांनी केला.

लोकशाहीच्या विरोधात बोलून ‘व्होट जिहाद’ला समर्थन दिले जात असल्याचे राणे म्हणाले. ‘एसआयआर’वर जर एवढाच आक्षेप होता, तर लोकसभेनंतर तुमचे तोंड का बंद होते, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. स्वतःचे खासदार मोहल्ल्यातून निवडून येताना गप्प राहणारे आता विधानसभा आणि बीएमसी निवडणुकीत लोकांनी नाकारल्याने आक्षेप घेत आहेत. जर तुम्ही ‘एसआयआर’वर बोट दाखवत असाल, तर आधी आदित्य ठाकरे आणि दादरचे आमदार महेश सावंत यांनी राजीनामा द्यावा, असे थेट आव्हान राणे यांनी दिले.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही