शाहरुख खान, अजय देवगणची गय नाहीच; जाहिरातींवरून एफडीए आयुक्त तुकाराम मुंढेंचा इशारा

पान मसाल्याच्या जाहिरातीप्रकरणी एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना कायदेशीर कारवाईचा स्पष्ट इशारा दिला आहे.

Published On: 

Tukaram Mundhe

प्रतिनिधी, 12 ऑक्टोबर: राज्याचे अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यापासून तुकाराम मुंढे यांनी धडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. पान मसाला ब्रँडच्या कथित सरोगेट जाहिरातींप्रकरणी त्यांनी आपला मोर्चा आता थेट बॉलिवूडकडे वळवला असून शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ या आघाडीच्या कलाकारांना त्यांनी नोटीस बजावली होती. याप्रकरणी कायदा सर्वांसाठी समान असून कोणाचीही गय केली जाणार नाही, असा मोठा इशारा मुंढे यांनी दिला आहे.

एफडीएने बजावलेल्या या नोटीसला तिन्ही कलाकारांनी सुरुवातीला प्रतिसाद दिला नव्हता. मात्र, आता त्यांच्याकडून उत्तर देण्यात आले आहे. यावर बोलताना तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले की, नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वांचे पालन करून अंतिम निर्णय घेण्यापूर्वी किंवा पुढील कठोर कायदेशीर कारवाई करण्यापूर्वी संबंधित कलाकारांना आपली बाजू मांडण्याची किंवा त्यांचे म्हणणे ऐकून घेण्याची आणखी एक संधी दिली जाईल.

‘इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह २०२६’ मध्ये बोलताना मुंढे (Tukaram Mundhe) यांनी या प्रक्रियेची माहिती दिली. ते म्हणाले की, अन्न व औषध प्रशासन आपल्या कायदेशीर अधिकारांच्या कक्षेत राहूनच काम करत आहे आणि पुढील कारवाई ही सध्या लागू असलेल्या कायदेशीर चौकटीच्या आधारेच निश्चित केली जाईल.

कोणतीही जाहिरात करण्यापूर्वी कलाकारांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सुनावले. ‘अन्न सुरक्षा आणि मानके कायदा २०२६’ चे कलम २४ आणि ‘२०१८ च्या जाहिरातविषयक नियमां’चा संदर्भ देत मुंढे यांनी स्पष्ट केले की, जाहिरातीचे समर्थन करणाऱ्या संबंधित व्यक्तीचीच त्या जाहिरातीची जबाबदारी असते.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही