मनोज जरांगे यांच्या सांगण्यावरूनच माझ्यावर हल्ला; जुने सहकारी अमोल खुणे यांचा गंभीर आरोप

बीडमध्ये अमोल खुणे यांच्यावर तरुणांच्या जमावाने लाकडी दांडक्याने हल्ला केला. मनोज जरांगे यांनीच या हल्ल्याची सुपारी दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

Published On: 

Amol Khune accuses Manoj Jarange Patil of orchestrating attack in Beed

बीड, 11 ऑक्टोबर: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे जुने सहकारी अमोल खुणे यांच्यावर तरुणांच्या एका जमावाने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. “मनोज जरांगे यांच्या विरोधात का बोलतोस?” अशी विचारणा करत आपल्याला मारहाण करण्यात आल्याचा गंभीर आरोप खुणे यांनी केला आहे. तसेच, स्वतः जरांगे यांनीच या हल्ल्यासाठी सुपारी दिल्याचा दावाही त्यांनी (Amol Khune) केला आहे.

रविवारी दुपारी अमोल खुणे हे पाली गावाजवळील नागनाथ मंदिरात दर्शनासाठी गेले होते. त्याचवेळी तुळजापूरहून ज्योत घेऊन येणाऱ्या काही तरुणांचा गट तिथे पोहोचला. या तरुणांनी मंदिराचे गेट बंद करून लाकडी दांडक्याने आपल्याला बेदम मारहाण केल्याचे खुणे यांनी सांगितले. या हल्ल्यात त्यांच्या दोन्ही हातांना गंभीर दुखापत झाली असून, सध्या त्यांच्यावर बीड जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरू आहेत.

या हल्ल्यामागचे कारण सांगताना अमोल खुणे यांनी नारायणगडावरील दसरा मेळाव्याचा संदर्भ दिला आहे. आपण नारायणगडावर होणाऱ्या दसरा मेळाव्याला उपस्थित राहणार असल्याचे जाहीर केले होते. आपण तिथे पोहोचू नये आणि या मेळाव्याला हजेरी लावू नये, याच उद्देशाने आपल्यावर हा हल्ला घडवून आणल्याचा दावा खुणे यांनी केला आहे.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच बीड ग्रामीण पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे हलवली आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून, हल्ला करणारे ते तरुण नेमके कोण होते आणि यामागचे निश्चित कारण काय, याचा कसून तपास पोलिसांकडून सुरू आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही