Share

मनोज जरांगेंना मोठा झटका! मुंबईत आंदोलनासाठी शासनाचे नवे कडक नियम

मुंबईत आता आझाद मैदान वगळता इतर कुठेही आंदोलनास बंदी घालण्यात आली असून, वेळेच्या कडक मर्यादेमुळे मनोज जरांगे आणि लक्ष्मण हाकेंना मोठा धक्का बसला आहे.

Published On: 

Mumbai Protest Rules police security at Azad Maidan for Maratha and OBC agitation | manoj jarange

Manoj Jarange: मुंबईत जाऊन सरकारला धडकी भरवण्याचा विचार करणाऱ्या नेत्यांना आता प्रशासनानेच ‘ब्रेक’ लावलाय. मनोज जरांगे पाटील आणि लक्ष्मण हाके यांच्या नियोजित आंदोलनाआधीच राज्याच्या गृह विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे मुंबईत आझाद मैदान वगळता इतर कुठेही आंदोलन, धरणे किंवा जाहीर सभा घेण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.

आझाद मैदानातही वेळेची मर्यादा आणि कठोर अटी

आझाद मैदानात आंदोलन करायचं असेल, तरीही तुम्हाला फक्त एका दिवसाचीच परवानगी मिळेल. तीही सकाळी ९ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंतच. ६ वाजल्यानंतर जर कुणी तिथे थांबण्याचा प्रयत्न केला, तर त्याला दंड आणि कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. मोर्चे आणि बेमुदत ठिय्या आंदोलनांना आता मुंबईत ‘नो एन्ट्री’ आहे.

अधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आंदोलनात ट्रॅक्टर, ट्रॉली, बैलगाडी आणि प्राणी आणण्यास सक्त मनाई आहे. या नव्या नियमांमुळे आगामी काळात होऊ घातलेल्या मराठा आणि ओबीसी आंदोलनांसमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे. याबाबत अधिक माहिती हाती आल्यावर बातमी अपडेट केली जाईल.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही