Ramgiri Maharaj Threat : सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांना वारंवार जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. त्यांनी केलेल्या विधानांमुळे त्यांच्यावर गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. त्यांच्या विधानामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना धमक्या मिळाल्या आहेत.
महंत रामगिरी महाराज यांना मिळालेल्या धमक्यांच्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोर भूमिका घेतली आहे. “आता धमकी देण्याचे काम केले तर नेस्तनाबूत करून टाकू.” असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी दिला.
श्री संत सद्गुरू योगीराज गंगागिरीजी महाराज यांचा १७९ वा ‘अखंड हरिनाम सप्ताह’ आयोजित करण्यात आला होता. या पवित्र कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांशी संवाद साधला.
CM Devendra Fadnavis on Ramgiri Maharaj threat
यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘ आता जगाने मान्य केले आहे की, युरोपासारखे देश अस्तित्वात नव्हते. त्यावेळी तेथील लोकांना संस्कृती, विचार भाषा माहीत नव्हते. त्यावेळी आपल्या देशात विकसित संस्कृती होती. त्यावेळी खऱ्या अर्थाने लोकांना संस्कार देत होतो. तोच हरिनामाचा पाठ होता. आमची संस्कृती, सभ्यता आणि वारसा अखंड चलत होता.”
पुढे त्यांनी सांगितले की, “जगाच्या इतिहासात अनेक आक्रमणे झाली. त्यावेळी त्यांनी संस्कृती बदलली. परंतु भारतात परिवर्तन होऊ शाळे नाही. भारतावर आक्रमण होऊनही कोणताही परिणाम झाला नाही. वारकरी, हरिनाम सनातन आणि हिंदू परंपरेमुळे कोणताही आघात झाला नाही. आक्रमणानंतरही देश, धर्म, विचार बदलला नाही.”
“आक्रमण केल्याने किल्ले जिंकले. मंदिर तोडली. परंतु मनातील ईश्वराचं स्थान बदलू शकले नाही. सप्ताहातने समाजाचे अभिसरण केले. त्यामुळे कोणी आम्हाला मानसिक गुलाम करू शकले नाही. हरिनामाचा गजर कोणी थांबवू शकले नाही. संताची परंपरा थांबवू शकले नाही.” असे फडणवीसांनी आपल्या भाषणातून सांगितले.
“हरिनाम सप्ताहामुळे आपण सगळे एक होतो. कोणीही जातीपातीचा विचार करत नाही. स्वत:चा विचार करत नाही. सगळे एकमेकांमध्ये विठ्ठल पाहतात. मी खऱ्या अर्थाने महंत रामगिरी महाराजांचे आभार मानतो. त्यांनी उभ्या केलेल्या संप्रदायाचं कौतुक वाटतंय. कारण हा संप्रदाय संस्कार जपत आहे.” असेही फडणवीसांनी सांगितले.
“मागच्या वर्षी सरला बेटावर ज्या ठिकाणी अध्यात्माचा वास आहे. जिथून विचाराची प्रेरण मिळते, त्या बेटावर वेगवेगळ्या विकासकामाचा आढावा घेतला. तिथे हॉल झाला. रस्त्यांची कामे झाले. पूर संरक्षणाची काम होत आहेत. पुढील काळात विकास आराखडा झाल्यावर सरला बेट संपूर्ण महाराष्ट्रातील भाविकांसाठी उर्जेचे केंद्र ठरेल. सरला बेटाचा विकास केल्याशिवाय सरकार शांत बसणार नाही,” असे फडणवीस यांनी सांगितले.
पुढे फडणवीस म्हणाले की, “शिंदेसांहेबांनी सांगितल्यानुसार आमच्यापाठिमागे शक्ती उभी होती. म्हणून महाराष्ट्रात विजय आम्हाला मिळाला. शेतकरी, वारकरी, गरीब, दलित, आदिवासी असतील, अशा सर्वांना सोबत घेऊन महाराष्ट्राचा कारभार करत आहोत. शेतकऱ्यांना शब्द दिला होता. आम्ही कर्जमाफीची फक्त घोषणा केली नव्हती, तर कालपर्यंत साडेबारा लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पोहोचवले.”
“दर पंधरा दिवसांनी नवीन यादी तयार करून पैसे पोहोचवत आहोत. ५६ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार आहे. शेतकऱ्यांना मोफत वीज देत आहोत. तसेच शेतकऱ्यांना दिवसाच ३६५ दिवस लाइट मिळाली पाहिजे, ७५ टक्के शेतकर्यांना दिवसा आठ तास वीज देत आहोत. हळूहळू १०० टक्के शेतकऱ्यांना वीज पुरवठा करू. त्यानंतर शेतकऱ्यांना १२ तास ३६५ दिवस मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे.” असेही फडणवीस यांनी सांगितले.
“एवढेच नाही, तर शेतकऱ्यांवर ५८ लाखांची थकीत बिले आहेत. ती माफ करत आहोत. शेतकऱ्यांकडून वसुली करायची नाही, असे ठरवले आहे. शेतकरी हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे. तोच खरा अर्थाने हरिनामाच्या माध्यमातून अध्यात्मिक शक्तीला जागृत ठेवतो. आता सर्वांना आश्वस्त करतो.”
“रामगिरी महाराजांकडे धमकी पाठवतात. धमकी देण्याचे काम केले तर नेस्तनाबूत करून टाकू. आम्ही केसालाही धक्का लागू देणार नाही. आम्ही सन्मार्ग निवडला, त्याला कोणी रोखू शकत नाही, असेही फडणवीसांनी ठणकावून सांगितले.
📌 महत्वाच्या बातम्या
- साखरेच्या वाढत्या दराने चिंता वाढली; सिद्धेश्वर कारखान्याबाहेर शेतकऱ्यांची गर्दी
- ‘भाजपला राजकीय निवृत्ती घ्यायला भाग पाडू’; ममता बॅनर्जींचा इशारा
- ‘एकदातरी मराठी माणूस पंतप्रधान व्हावा’; विजय वडेट्टीवारांची इच्छा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











