Share

कुणालचा आयफोनचा हट्ट अन् अख्खं कुटुंब संपलं; खवड्या डोंगरावरील घटनेत पोलिसांचा मोठा गौप्यस्फोट

आयफोन १५ साठी डोंगरावर गेलेल्या मुलाला वाचवताना वडिलांचा तोल गेला. हे पाहून आईनेही दरीत उडी घेतल्याने एकाच कुटुंबातील तिघांचा करुण अंत झाला.

Published On: 

Khavdya Dongar Suicide family tragedy spot in Sambhajinagar

मोबाईलचा एक हट्ट एका संपूर्ण कुटुंबाचा जीव घेऊ शकतो? छत्रपती संभाजीनगरमधील खवड्या डोंगरावर घडलेल्या घटनेने सर्वांचेच डोळे पाणावले आहेत. एका क्षणाच्या रागाने हसत्या-खेळत्या कुटुंबाची राखरांगोळी केली.

‘ॲपल आयफोन १५’ हवा म्हणून १८ वर्षांचा कुणाल चांदवडे डोंगरावर जीव द्यायला गेला. त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात वडील मुरलीधर यांचा तोल गेला आणि हे भयानक दृश्य पाहून आई संगीतानेही दरीत उडी घेतली. तिघांचाही जागीच मृत्यू झाला.

खवड्या डोंगर आत्महत्या: पोलिसांच्या माहितीतून चक्रावून टाकणारं सत्य उघड

सकाळी दहाच्या सुमारास कुणाल रागाच्या भरात डोंगरावर पोहोचला. ११२ वरून कॉल आल्यानंतर पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जर त्याने उडी मारलीच, तर त्याचा जीव वाचावा यासाठी त्यांनी डोंगराच्या पायथ्याशी जाळीही लावली होती.

कुणाल मात्र वारंवार जागा बदलून चकवा देत होता. तब्बल तीन तास त्याला समजवण्याचे प्रयत्न सुरू होते. आई स्वतः त्याच्यासमोर बसून समजूत घालत होती. विशेष म्हणजे, कुणालचे मनपरिवर्तन होतही होते.

पण इथेच नियतीने क्रूर डाव साधला. गर्दीतून अचानक वडील पुढे आले. पोलीस किंवा प्रशासनाला ते वडील आहेत, याची सुरुवातीला कल्पनाच नव्हती. त्यांनी थेट कुणालला ओढून वाचवण्याचा प्रयत्न केला. पण याच झटापटीत दोघांचाही तोल गेला आणि ते थेट दरीत कोसळले.

डोळ्यांदेखत नवरा आणि मुलगा दरीत पडल्याचं पाहून आईला मोठा धक्का बसला. क्षणार्धात तिचं विश्वच उद्ध्वस्त झालं. शोक अनावर झाल्याने तिनेही क्षणाचाही विचार न करता त्यांच्या पाठोपाठ दरीत उडी घेतली.

एका क्षुल्लक कारणावरून सुरू झालेल्या वादाचा असा भयंकर शेवट होईल, याची कुणी कल्पनाही केली नव्हती. बचाव पथकाने तिघांचेही मृतदेह बाहेर काढले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही