🕒 1 min read
EPFO EDLI Scheme: तुमच्या पीएफ (PF) खात्यावर तब्बल सात लाख रुपयांचा मोफत विमा मिळतो, हे तुम्हाला माहितीये का? बऱ्याच नोकरदारांना याची साधी माहितीही नसते. पण आता केंद्र सरकारने देशातील कामगार वर्गाला आणखी एक सुखद धक्का दिला आहे. या नव्या निर्णयामुळे तुमच्या कुटुंबाची आर्थिक सुरक्षा पूर्वीपेक्षा अधिक भक्कम होणार आहे.
ईपीएफओने (EPFO) देशभरातील तब्बल सात कोटींहून अधिक कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. २९ जूनपासून सामाजिक सुरक्षा संहिता २०२० अंतर्गत ‘एम्प्लॉईज डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्स’ (EDLI Scheme 2026) ची नवी व्यवस्था देशभरात लागू करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या नव्या नियमामुळे पीएफ खात्यावरील जुन्या ७ लाखांच्या विम्यासह आता १ लाख रुपयांचा अतिरिक्त फायदाही कर्मचाऱ्यांच्या वारसांना थेट मिळणार आहे. तब्बल पाच दशकांची जुनी व्यवस्था मोडीत काढत सरकारने हा मोठा बदल केला आहे.
PF खात्यावरील नवीन EDLI Scheme 2026
या नव्या योजनेचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे पीएफ बॅलन्सवर आधारित मिळणारा वाढीव लाभ. समजा एखाद्या ईपीएफ सदस्याचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर त्याच्या वारसांच्या बँक खात्यात पीएफची संपूर्ण रक्कम जमा होईलच, पण त्यासोबत एक लाख रुपयांपर्यंतची अतिरिक्त मदतही मिळेल. जर कर्मचाऱ्याचे सरासरी पीएफ बॅलन्स ५० हजारांपेक्षा जास्त असेल, तर कुटुंबाला ५० हजार रुपये निश्चित दिले जातील. त्यानंतरच्या उर्वरित रकमेच्या ४० टक्के भाग यात जोडला जाईल. नव्या तरतुदीनुसार हा अतिरिक्त लाभ किमान एक लाख रुपयांपर्यंत असणार आहे.
दुसरीकडे, सरकारने मोफत विम्याचे जुने फायदे अजिबात कमी केलेले नाहीत. आधीप्रमाणेच किमान अडीच लाख आणि कमाल सात लाख रुपयांपर्यंतचा विमा दावा सुरक्षित ठेवण्यात आला आहे. यासाठी कर्मचाऱ्याने सलग १२ महिने काम करणे आवश्यक असते. शिवाय, काही विशिष्ट परिस्थितीत विम्याच्या लाभात २० टक्के अतिरिक्त वाढ मिळण्याचा जुना पर्यायही कायम ठेवण्यात आला आहे.
यातील सर्वात मोठा दिलासा म्हणजे नोकरी सुटल्यानंतरच्या काळासाठी दिलेली सवलत. अनेकदा नोकरी सुटल्यामुळे पीएफ भरणं बंद होतं आणि अशा वेळी मृत्यू झाल्यास कुटुंबाला क्लेम करताना मोठ्या अडचणी येतात. पण आता सरकारने ही अडचण कायमची दूर केली आहे. पीएफ भरणं थांबल्यानंतरही ६ महिन्यांच्या आत जर कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर त्याचे कुटुंबीय या ७ लाखांच्या विम्यासाठी बिनदिक्कत दावा करू शकतात. त्यामुळेच अचानक ओढवलेल्या संकटाच्या काळात ही नवी व्यवस्था कुटुंबासाठी मोठा आधार ठरत आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- सोलापूर हादरलं: लग्न होऊन अवघे दोन महिने, २६ वर्षीय तरुणाने टोकाचं पाऊल का उचललं?
- वैभव सूर्यवंशीवरून निवडकर्त्यांना सुनावलं! टीम इंडियाच्या पराभवानंतर माजी क्रिकेटर रोखठोक बोलला
- स्मार्ट मीटरमुळे बिल वाढलं? मुख्यमंत्र्यांनी मांडलं गणित; स्मार्ट मीटर की दुसरं काही? वाचा सविस्तर!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












