Share

Maharashtra Heavy Rain: महाराष्ट्रात पावसाचा कहर; मुंबई-पुणे वाहतूक विस्कळीत, शाळांना सुट्टी

राज्यभर मुसळधार पावसामुळे मुंबई-पुणे रेल्वे व रस्ते वाहतूक विस्कळीत झाली आहे. अनेक जिल्ह्यांतील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली असून मुंबईतील दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू झाला आहे.

Published On: 

Maharashtra Rain

Maharashtra Heavy Rain : महाराष्ट्रात मुसळधार पावसाने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. अनेक भागांत रस्ते जलमय झाले आहे. यामुळे रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. मुंबईतील (Mumbai) एका दुर्दैवी घटनेत चाळीचा भाग कोसळून 6 जणांचा मृत्यू झाला असून, अनेक ठिकाणी बचावकार्य सुरू आहे.

पुणे (Pune) जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे प्रशासनाने शाळांना सुट्टी (School Holiday) जाहीर केली आहे. तसेच मुंबई, ठाणे, पालघर आणि पुणे जिल्ह्यातील सर्व शाळा आज बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

दरम्यान, कर्जत-लोणावळा दरम्यानच्या दक्षिण-पूर्व घाट विभागात ठाकूरवाडी ते मंकी हिल परिसरात रेल्वे मार्गावर दरड कोसळल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. अनेक लोकल आणि एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या असून काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत.

याशिवाय मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील (Mumbai–Pune Expressway) मिसिंग लिंक प्रकल्पातील बोगदा क्रमांक 2 बाहेरही दरड कोसळल्याने पहाटेपासून वाहतूक वळवण्यात आली आहे. प्रशासनाकडून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात असून नागरिकांना सुरक्षिततेच्या सूचना देण्यात येत आहेत.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही