Share

राजपाल यादवला 1.11 कोटींची मदत; राजपाल यादवसाठी धावून आलेला हा देवदूत नेमका कोण आहे?

९ कोटींच्या चेक बाउन्स प्रकरणात तुरुंगात असलेल्या राजपाल यादवला राव इंद्रजित सिंह यांनी १.११ कोटींची घसघशीत मदत केलीये. पण हा उद्योगपती कोण?

Published On: 

Rajpal Yadav : राजपालला १.११ कोटींची मदत, देवदूत कोण?

रुपेरी पडद्यावर आपल्या भन्नाट विनोदी टायमिंगने प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या राजपाल यादववर (Rajpal Yadav) सध्या मोठी वेळ आलीये. ‘भूल भुलैया’, ‘हंगामा’, आणि ‘वेलकम’ सारख्या चित्रपटांमधून त्याने आपल्याला भरपूर हसवलं. पण आता खऱ्या आयुष्यात त्याच्यावर न हसण्यासारखी परिस्थिती ओढवलीये.

९ कोटी रुपयांच्या चेक बाउन्स प्रकरणात तो थेट तिहार तुरुंगात पोहोचलाय. पण या अंधारात त्याला एक मोठा आशेचा किरण मिळालाय. बॉलिवूडमधल्या अनेकांनी त्याला मदतीचा हात दिला असला तरी, एका व्यक्तीने चक्क १.११ कोटी रुपयांची मोठी रसद पुरवली आहे. राजपाल यादवसाठी धावून आलेला हा देवदूत नेमका कोण आहे? हा प्रश्न आता (Rajpal Yadav Receives 1.11 Crore) या बातमीमुळे इंटरनेटवर आणि सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय.

Rajpal Yadav News

या उद्योगपतीचं नाव आहे राव इंद्रजित सिंह यादव. ते ‘जेम ट्यून्स’ (Gem Tunes) या म्युझिक आणि ओटीटी प्लॅटफॉर्मचे मालक आहेत. २००६ पासून ते प्रादेशिक गाण्यांच्या निर्मितीत सक्रिय आहेत. त्यांनी स्पष्ट केलंय की, “ही मदत फक्त पैशांची नाही, तर कठीण काळात आपल्या कुटुंबातील एका महत्त्वाच्या सहकाऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याची आहे.”

पण खरी खळबळ उडालीये ती या उद्योगपतीच्या पार्श्वभूमीमुळे. राजपाल यादवला संकटकाळात मदत करणारा हा उद्योगपती स्वतःच मोठ्या अडचणीत असल्याचं समजतंय. काही काळापूर्वी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मनी लाँड्रिंग प्रकरणी राव इंद्रजित यांच्या दिल्ली, गुरुग्राम आणि रोहतकमधील दहा ठिकाणांवर छापे टाकले होते.

ईडीच्या या धाडीत चक्क पाच आलिशान गाड्या, बँक लॉकर आणि अनेक गुन्हेगारी कागदपत्रं जप्त करण्यात आल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला होता. एवढंच नाही तर, कारवाईच्या भीतीने ते थेट युएईला पळून गेल्याचीही दबक्या आवाजात चर्चा आहे. त्यामुळे आता राजपाल यादवला मिळालेली ही मदत जितकी दिलासादायक आहे, तितकीच ती देणाऱ्या व्यक्तीची पार्श्वभूमीही चक्रावून टाकणारी ठरलीये.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install