🕒 1 min read
सध्या ए.आर. रहमान (AR Rahman) आणि ‘वाद’ हे जणू समीकरणच झालंय की काय? ‘छावा’ चित्रपटावरून सुरू झालेला गदारोळ अजून शमला नाहीये, तोच आता या वादात प्रसिद्ध भजन सम्राट अनुप जलोटा यांनी उडी घेतली आहे. त्यांनी रहमान यांना असा काही सल्ला दिलाय की ज्यामुळे सोशल मीडियावर पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. “जर तुम्हाला वाटत असेल की धर्मामुळे काम मिळत नाही, तर मग पुन्हा हिंदू धर्म स्वीकारून पाहा,” असं थेट आव्हानच जलोटा यांनी दिलं आहे.
Anup Jalota Advice to AR Rahman
काही दिवसांपूर्वी ऑस्कर विजेते संगीतकार ए.आर. रहमान (AR Rahman) यांनी धार्मिक कारणामुळे आपल्याला हिंदी चित्रपटसृष्टीत काम मिळत नसल्याचा अप्रत्यक्ष दावा केला होता. त्यांच्या या विधानानंतर इंडस्ट्रीमध्ये दोन गट पडले. काहींनी त्यांना पाठिंबा दिला, तर काहींनी त्यांच्यावर टीका केली. आता यात ज्येष्ठ गायक अनुप जलोटा (Anup Jalota) यांनी आपली रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे.
जलोटा म्हणाले, “रहमान यांच्या या मताशी मी अजिबात सहमत नाही. रहमान हे मूळचे हिंदू होते, त्यांचं नाव दिलीप कुमार होतं. त्यानंतर त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारला आणि आपल्या करिअरमध्ये अफाट यश मिळवलं. लोकांनी त्यांच्यावर प्रेमच केलं आहे. पण, आता जर त्यांना असं वाटत असेल की, केवळ मुस्लिम असल्यामुळे त्यांना काम नाकारलं जातंय, तर मी त्यांना एकच सल्ला देऊ इच्छितो… त्यांनी पुन्हा हिंदू धर्म स्वीकारावा आणि त्यानंतर त्यांना काम मिळतं की नाही, हे त्यांनी पाहावं.”
जलोटा एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी रहमान यांना आपलं नशीब पुन्हा एकदा धर्मांतर करून अजमावून पाहण्याचाही सल्ला दिला. त्यामुळे आता हा वाद शमण्याऐवजी भडकण्याची चिन्हं आहेत.
दुसरीकडे, आपल्या विधानाचा चुकीचा अर्थ काढला गेल्याचं ए.आर. रहमान यांनी स्पष्ट केलं आहे. “माझा हेतू कोणाच्याही भावना दुखावण्याचा नव्हता. भारत हेच माझं घर, गुरू आणि प्रेरणास्थान आहे,” असं सांगत त्यांनी या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केलाय. मात्र, अनुप जलोटांच्या या ‘घरवापसी’च्या सल्ल्यामुळे Social Media वर नेटकऱ्यांमध्ये जोरदार जुगलबंदी सुरू झाली आहे. आता यावर रहमान काही प्रत्युत्तर देतात का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
📌 महत्वाच्या बातम्या
- Gold Rate : एका दिवसात २५०० रुपयांचा भडका! सोनं दीड लाखांच्या उंबरठ्यावर, जाणून घ्या नवा भाव!
- विदेशी गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र हेच भारताचे गेट वे ऑफ इंडिया; देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
- बीसीसीआयचा विराट-रोहितला मोठा धक्का? विराट-रोहित थेट ‘B’ ग्रेडमध्ये?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












