Share

एकनाथ शिंदे भडकले, आता मंत्र्यांची ‘गच्छंती’ फिक्स? हॉटेल ताजमध्ये मोठ्या घडामोडी

पालिका निवडणुकीतील सुमार कामगिरीमुळे एकनाथ शिंदे नाराज असून, आता मंत्र्यांची खांदेपालट होण्याची शक्यता आहे. मुंबईत गटनेता निवडीसाठी हालचालींना वेग आला आहे.

Published On: 

Eknath Shinde Thane Exit Poll | BMC Election Result 2026

मुंबई – निवडणुकांचे निकाल लागले आणि जल्लोष होण्याऐवजी आता शिवसेनेच्या (शिंदे गट) मंत्र्यांची धाकधूक वाढली आहे. २९ जिल्ह्यांच्या पालिका निवडणुकांमध्ये (BMC Election Result 2026) अपेक्षित यश न मिळाल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) प्रचंड नाराज असल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आता शिंदे थेट ‘भाकरी फिरवण्याच्या’ तयारीत असून, ज्या मंत्र्यांनी आणि आमदारांनी सुमार कामगिरी केली, त्यांना आता डच्चू मिळण्याची दाट शक्यता आहे.

BMC Election Result 2026

निवडणुकीपूर्वीच शिंदेंनी मंत्र्यांना ‘परफॉर्मन्स दाखवा किंवा घरी बसा’ असे स्पष्ट संकेत दिले होते. ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगर वगळता इतरत्र शिंदेंच्या शिलेदारांना आपली जादू दाखवता आली नाही. त्यामुळेच आता अकार्यक्षम मंत्र्यांची हकालपट्टी करून नव्या आणि तरुण चेहऱ्यांना मंत्रिपदाची संधी दिली जाईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. जिल्हा परिषद आणि पालिका निवडणुका ही या मंत्र्यांसाठी लिटमस टेस्ट होती, ज्यात अनेक बडे नेते नापास झाल्याचं चित्र आहे.

मुंबईत ‘ताज’ हॉटेलमध्ये खलबतं एकीकडे नाराजीनाट्य सुरू असतानाच, मुंबईतही मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. निवडून आलेल्या नगरसेवकांची फाटाफूट होऊ नये म्हणून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ताज हॉटेलमध्ये फिल्डिंग लावली आहे. आजच पालिकेतील गटनेता निवडला जाणार असून, या शर्यतीत यामिनी जाधव, तृष्णा विश्वासराव आणि अमेय घोले यांची नावे आघाडीवर आहेत. कायदेशीर कचाट्यात सापडू नये म्हणून तातडीने ‘गट’ स्थापन करण्याच्या हालचाली सुरू आहेत.

मुंबईत शिंदेंना फटका बसण्याचं मुख्य कारण ‘घराणेशाही’ मानलं जातंय. सदा सरवणकर, रवींद्र वायकर, राहुल शेवाळे अशा बड्या नेत्यांच्या मुलांना, नातेवाईकांना तिकीटं दिली, पण मतदारांनी त्यांना घरचा रस्ता दाखवला. स्थानिक निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून लेकरांना तिकीटं वाटल्यानेच BMC Election 2026 मध्ये हा फटका बसल्याची कुजबूज पक्षात सुरू आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही