Share

माझ्या हत्येचा कट भाजपने रचला होता, फडणवीस सरकार जबाबदार! – प्रवीण गायकवाड

Pravin Gaikwad claims BJP workers plotted his murder after assault in Akkalkot event

Published On: 

Sambhaji Brigade Pravin Gaikwad ( Praveen Gaikwad ) claims BJP workers plotted his murder after assault in Akkalkot event

सोलापूर – अक्कलकोटमध्ये संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड ( Pravin Gaikwad ) यांच्यावर काळं फासून मारहाण करण्यात आली. यानंतर त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत “माझी हत्या करण्याचा कट रचण्यात आला होता,” असा थेट आरोप केला आहे. ही घटना फत्तेसिंह शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाज आयोजित कार्यक्रमात घडली. या वेळी शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी गायकवाड यांना घेरून हल्ला केला.

सोलापूरमध्ये माध्यमांशी बोलताना गायकवाड म्हणाले, “माझ्यावर हल्ला करणारे भाजपचे कार्यकर्ते होते. आम्ही फुले, शाहू, आंबेडकर यांचे विचार मांडतो, म्हणूनच हे कटकारस्थान रचले गेले.” त्यांनी सरकारवरही ( Devendra Fadnavis ) ठपका ठेवत म्हटले, या घटनेला सरकार जबाबदार आहे.

Pravin Gaikwad alleges assassination plot

गायकवाड म्हणाले, “गेल्या ३० वर्षांपासून मी मराठा समाजासाठी झटतोय. ज्या लोकांनी माझ्यावर हल्ला केला त्यांना पश्चात्ताप होईल. शाहू-फुले-आंबेडकरांचा विचार संपवायचा प्रयत्न फोल ठरेल.”

“डॉ. दाभोळकरांच्या हत्येनंतर पुरोगामी कार्यकर्त्यांना अजूनही धोका आहे. आता माझ्यावरही हल्ला झाला. माझा जीव घेण्याचा कट होता, हे मी उघडपणे सांगतो आहे. सरकारने याचा छडा लावला पाहिजे,” अशी मागणी त्यांनी केली.

गायकवाड यांनी स्पष्ट केलं की, “संभाजी ब्रिगेडचं काम सुरूच राहील. मी ज्ञानेश महाराव यांच्याशी बोललो आहे. आमचं आंदोलन न थांबता चालू राहील. सरकारने तातडीने कारवाई करावी,” अशी ठाम मागणी त्यांनी ( Pravin Gaikwad ) केली.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही