Share

40 लाखांच्या फॉर्च्युनरसाठी वैष्णवीला कशाला छळू? आमच्याकडे पाच कोटींच्या गाड्या!- वकिलांचा कोर्टात थरारक युक्तिवाद

Husband slapping wife is not harassment, says lawyer in Vaishnavi suicide case. Claims chats, expensive cars prove no motive.

Published On: 

Vaishnavi Suicide Case: “Slap Isn’t Harassment”, Lawyer Says in Court – Claims Expensive Cars, Chats Reveal Truth - Vaishnavi Suicide Case

🕒 1 min read

पुणे – शहरात गाजत असलेल्या वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात ( Vaishnavi Suicide Case ) आरोपींची पोलिस कोठडी वाढवण्यात आली आहे. यावेळी सासरे राजेंद्र हगवणे यांच्या वतीने कोर्टात जो युक्तिवाद मांडण्यात आला, तो प्रचंड वादग्रस्त ठरला.

राजेंद्र हगवणे यांच्या वकिलांनी कोर्टात सांगितले की, “एखाद्या नवऱ्याने आपल्या बायकोला चार कानाखाली मारल्या म्हणजे तो छळ ठरत नाही.” वैष्णवीचे नको त्या व्यक्तीसोबत चॅट सुरू होते, आम्ही ते पकडले होते, असा दावाही त्यांनी केला. तसेच वैष्णवीची आत्महत्या करण्याची प्रवृत्ती होती, तिने याआधीही रॅट पॉइझन आणि गाडीखाली उडी घेण्याचा प्रयत्न केला होता, असेही वकिलांनी सांगितले.

Vaishnavi Suicide Case Pune 

वकिलांनी दावा केला की, “राजेंद्र हगवणे यांच्याकडे पाच कोटींच्या गाड्या आहेत. ते 40 लाखांच्या फॉर्च्युनरसाठी का छळ करतील?” त्यामुळे पोलिस कोठडीऐवजी न्यायालयीन कोठडी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

निलेश चव्हाणला या प्रकरणात आरोपी करणे चुकीचे आहे. निलेश चव्हाणने बाळाचा सांभाळ केला. निलेश चव्हाण हा हगवणेंचा नातेवाईक नाही. तो दोषी असेल तर त्याला फाशी द्या. पण त्याला या प्रकरणात आरोपी करणेच चुकीचे असल्याचे वकिलांनी सांगितले.

दरम्यान, सरकारी वकिलांनी 51 तोळे सोने कुठे गहाण ठेवले आहे, त्याचा तपास घेणे आवश्यक असल्याने पोलिस कोठडी वाढवावी, अशी मागणी केली होती. कोर्टाने शशांक, लता आणि करिश्माला एक दिवसाची तर राजेंद्र आणि सुशील हगवणेला 31 मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही