Share

विभागीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीची 12 फेब्रुवारी रोजी बैठक

छत्रपती संभाजीनगर, दि.04 :- विभागीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीची ( Anti-Corruption Committee ) 12 फेब्रुवारी रोजी दुपारी 1 वाजता विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे. विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर तथा अध्यक्ष, विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समिती यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार असल्याचे विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे सदस्य सचिव तथा अपर आयुक्त (महसूल) यांनी कळविले आहे. … Read more

Published On: 

Departmental Anti-Corruption Committee meeting on February 12

छत्रपती संभाजीनगर, दि.04 :- विभागीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीची ( Anti-Corruption Committee ) 12 फेब्रुवारी रोजी दुपारी 1 वाजता विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे. विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर तथा अध्यक्ष, विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समिती यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार असल्याचे विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे सदस्य सचिव तथा अपर आयुक्त (महसूल) यांनी कळविले आहे.

विलंब, गैरव्यवहार, अकार्यक्षमता व इतर कारणाने होणाऱ्या भ्रष्टाचाराबाबत जनतेच्या तक्रारी तसेच गाऱ्हाणी समितीकडून ऐकून घेण्यात येत असून लेखी स्वरूपातील तक्रारी स्विकारण्यात येतात. विशिष्ट अभिकथनाबाबत स्वतंत्र्यपणे स्थानिक चौकशी करण्याच्या दृष्टीने तजवीजही करण्यात आली आहे.

भ्रष्टाचार कोणत्या क्षेत्रात तसेच ठिकाणी होत आहे याबाबत माहिती घेत त्या क्षेत्रातील किंवा त्या ठिकाणी भ्रष्टाचार निर्मुलनासाठी उपाययोजना केल्या जातात. तसेच प्रशासकीय कार्यपध्दती, नियम व इतर शासकीय व्यवस्थेमध्ये भ्रष्टाचारास वाव राहू नये व त्यांचे निर्मुलन व्हावे यादृष्टीने सुलभता व पारदर्शकता आणण्याबाबत शिफारस करण्यात येते. सामान्य जनतेच्या प्रशासकीय कार्यपध्दतीबद्दल साशंकता वाटणार नाही व जनतेची कामे सहजगत्या कशी होतील याबाबत समितीमार्फत सबंधितांना सूचनाही बैठकीत देण्यात येतात.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही