Share

धनंजय मुंडेंच्या आरोपांना Anjali Damania यांचा पलटवार, म्हणाल्या; “तुमची जागा..”

Anjali Damania । सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया सातत्याने मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांचा राजीनामा मागत आहेत. आजच त्यांनी पत्रकार परिषद घेत मुंडेंनी 275 कोटींचा घोटाळा केला असल्याचा दावा केला. यावर मुडेंनीही दमानिया यांच्यावर निशाणा साधला आहे. अशातच आता दमानिया यांनीही पत्रकार परिषद घेतली आहे. “धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेतली. … Read more

by MHD

Published On: 

Anjali Damania criticized Dhananjay Munde

Anjali Damania । सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया सातत्याने मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांचा राजीनामा मागत आहेत. आजच त्यांनी पत्रकार परिषद घेत मुंडेंनी 275 कोटींचा घोटाळा केला असल्याचा दावा केला. यावर मुडेंनीही दमानिया यांच्यावर निशाणा साधला आहे. अशातच आता दमानिया यांनीही पत्रकार परिषद घेतली आहे.

“धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी माझं नाव दमानिया नाही तर बदनामीया नावं ठेवलं. जर त्यांनी पुराविया ठेवलं असतं तर चाललं असते. बदनाम लोकांचे मी पुरावे देत असून मी एक-एक पुरावे काढून तुमची जागा दाखवणार आहे. जितका वेळ तुम्ही कराड सोबत होता, त्यापेक्षा एक क्षण तुम्ही मंत्री म्हणून बसला असता तर तुमच्यावर अशी वेळ आली नसती,” असे वक्तव्य दमानिया यांनी केले. (Anjali Damania vs Dhananjay Munde)

पुढे त्या म्हणाल्या की, “मला अधिकार होता असं मुंडे म्हणतात. 12 एप्रिल 2018 चा जीआर असून नवीन वस्तूंचा समावेश करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना दिला आहे. मुख्यमंत्र्यांना वस्तू वगळण्याचा अधिकार दिला नाही. मुंडेंनी डोळे उघडून पाहावे,” असा सल्लाही दमानिया यांनी दिला आहे.

Anjali Damania on Dhananjay Munde

दमानिया यांच्या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. राजकीय वर्तुळातही याचे पडसाद उमटू लागले आहे. यावर आता धनंजय मुंडे त्यांना काय प्रत्युत्तर देतात? याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

इतकेच नाही तर मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनीही मुंडेंवर निशाणा साधला आहे. “धनंजय मुंडे यांना मंत्रीपदावरून काढून टाका. कारण त्यांनी या पदावरून राहून पुरावे नष्ट केले आहेत. जर संतोष देशमुख हत्या (Santosh Deshmukh Murder Case) आणि खंडणी प्रकरणातील एकही आरोपी सुटला तर आम्ही उपमुख्यंमत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) जबाबदार धरू. अजित पवारांना माहिती असूनही ते मुडेंना पाठीशी घालत असून मुंडेंची ईडी चौकशी करा,” अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही