Share

IPL 2024 | आयपीएलच्या माध्यमातून ‘हे’ खेळाडू टी-20 विश्वचषक संघात मिळवू शकतील स्थान

When T20 World Cup will start 2024? । Will Kohli play 2024 T20 World Cup? । Where is the T20 World Cup 2023 schedule?

Published On: 

🕒 1 min read

IPL 2024 | टीम महाराष्ट्र देशा: आयपीएल 2024 साठी सर्वांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. 19 डिसेंबर 2023 रोजी दुबईमध्ये आयपीएलचा ( IPL 2024 ) लिलाव होणार आहे.

क्रिकेट प्रेमी आयपीएलची आतुरतेने वाट बघत आहेत. आयपीएल संपल्यानंतर क्रिकेट चाहते लगेचच टी-20 विश्वचषक स्पर्धेचा आनंद लुटणार आहेत.

अशात खेळाडू देखील यंदाच्या आयपीएलकडे ( IPL 2024 ) एक संधी म्हणून बघणार आहे. आयपीएलमध्ये उत्कृष्ट कामगिरी करून हे खेळाडू टी-20 विश्वचषक संघात स्थान मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे.

T20 World Cup will be played immediately after IPL 2024

आयपीएल 2024 ( IPL 2024 ) नंतर लगेच टी-20 विश्वचषक स्पर्धा खेळली जाणार आहे. या स्पर्धेसाठी सर्व खेळाडू जोरदार तयारी करत आहे.

त्याचबरोबर आयपीएलमध्ये ( IPL 2024 )  उत्कृष्ट कामगिरी आणि आपले कौशल्य प्रदर्शित करत काही खेळाडू टी-20 संघात स्थान मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे.

यामध्ये संजू सॅमसन ( Sanju Samson ), वॉशिंग्टन सुंदर ( Washington Sundar ), जितेश शर्मा ( Jitesh Sharma ), अर्षदीप सिंग ( Arshdeep Singh ) इत्यादी खेळाडूंचा समावेश आहे.

दरम्यान, एकेकाळी टी-20 मध्ये टीम इंडियाचा प्रमुख गोलंदाज असलेला युजवेंद्र चहल ( Yuzvendra Chahal ) काही दिवसांपूर्वी आपलं स्थान गमावून बसला आहे.

त्याचा पदभार रवी बिश्नोईने ( Ravi Bishnoi ) स्वीकारला आहे. त्यानंतर ऑगस्टपासून चहल टी-20 क्रिकेटपासून दूर आहे.

अशात आयपीएल ( IPL 2024 ) हंगामामध्ये चांगली कामगिरी करून चहल आपलं भारतीय संघातील स्थान परत मिळवणार असल्याच्या चर्चा सुरू आहे.

या खेळाडूंसह टी-20 क्रिकेटपासून लांब असलेले रोहित शर्मा आणि विराट कोहली देखील ही स्पर्धा खेळणार असल्याचं बोललं जात आहे. टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी रोहित शर्माने भारतीय संघाचं नेतृत्व अशी इच्छा बीसीसीआयने व्यक्त केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही