Share

Chhagan Bhujbal : महाराष्ट्रात आता मराठा शिल्लक राहणार नाही; छगन भुजबळांचं मोठं वक्तव्य

Chhagan Bhujbal on Manoj Jarange । Chhagan Bhujbal Says Maratha Community Loose The Identity । minister chhagan bhujbal said about maratha reservation all became kunbi obc । Now there are no Marathas left in Maharashtra, everyone has got OBC certificate | Maharashtra Assembly Winter Session

Published On: 

🕒 1 min read

Chhagan Bhujbal :  नागपुरात विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी (Maharashtra Assembly Winter Session) छगन भुजबळ आले आहेत. त्यावेळी त्यांनी मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे यांच्यावर टीका केली आहे. मराठे जर ओबीसीत येत असतील तर बाहेर कोण राहणार? असा कळीचा प्रश्न भुजबळ यांनी उपस्थित केला.

विधिमंडळात ओबीसींच्या मुद्द्यांवर चर्चेची आवश्यकताच नाही, कारण सर्व मराठा समाजाचे लोक कुणबी प्रमाणपत्र घेत आहेत आणि ओबीसीमध्ये येत आहेत. त्यामुळे मराठा आता महाराष्ट्रात शिल्लक राहणार नाही. सर्व कुणबीच होणार आहेत. तर मागासवर्ग आयोग राहिलेला नाही आता मराठा आयोग झाला असं वक्तव्य मंत्री आणि ओबीसी समाजाचे नेते छगन भुजबळ यांनी केलं आहे.

हरिभाऊ राठोड ओबीसीमध्ये फूट पाडण्यासाठी कित्येक वर्ष प्रयत्न करत आहेत. राज्य मागासवर्ग आयोगाचे सर्व लोक राजीनामा देत आहेत, तो आयोग आता ओबीसीचा राहिलेला नाही. तो मराठा आयोग झालेला आहे. जरांगेचा रोजचं काम आहे बोलणे, त्याच्याशिवाय त्याचं भाषण कोणी ऐकणार नाही.’

”’आता ज्याप्रमाणे दादागिरीने कुणबी सर्टिफिकेट घेतात, खोटी सर्टिफिकेट घेतात. तसेच पुढे सुद्धा होणार आहे. जात पडताळणीच्या वेळेलाही असेच होणार आहे. कोणी फोन करणार, कोणी दादागिरी करणार आणि जात पडताळणी करून घेणार, जर सर्व मराठा ओबीसीमध्ये येणार असतील तर, काय करायचं ओबीसीवर चर्चा घेऊन.

सर्व सर्टिफिकेट घेत आहेत, त्यासाठी प्रयत्न सुरू आहे, न्यायमूर्ती शिंदे गावोगावी फिरवून सर्टिफिकेट द्या सांगत आहे. आता काही शिल्लक राहिलेले नाही, आता महाराष्ट्रात मराठा शिल्लक नाही, सर्व कुणबी झाले आहेत”, असं भुजबळ म्हणाले आहेत.

भुजबळ पुढे म्हणाले की, ”अ ब क ड करण्याच्या मागणी संदर्भात यापूर्वी अभ्यास झालेला आहे आणि सवलती दिलेले आहे. त्यामुळे हरिभाऊ राठोड यांनी अभ्यास करावा आणि ओबीसीमध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न करू नये. जरांगे पाटील कसला हॅविवेट आहे, त्याला कोणीतरी उंचीवर घेऊन जात आहे. त्याच्या मनाप्रमाणे सर्व गोष्टी घडत आहेत, हेवीवेट वगैरे तो काही नाही.

महत्वाच्या बातम्या

 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही