🕒 1 min read
Pakistani Women | टीम महाराष्ट्र देशा: गेल्या काही दिवसांपूर्वी सीमा हैदर नावाची पाकिस्तानी महिला ( Pakistani Women ) भारतामध्ये आली होती.
आपल्या प्रियकाराला भेटायला सीमा हैदर भारतात आली होती. सीमा हैदर भारतात दाखल झाल्यानंतर तिच्याकडे संशयस्पद नजरेने बघितलं जात होतं.
त्याचबरोबर ती भारतामध्ये दाखल झाल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. अशात आणखी एक पाकिस्तानी महिला ( Pakistani Women ) भारतामध्ये शिरली आहे.
वाघा-अटारी आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून ही पाकिस्तानी महिला ( Pakistani Women ) भारतामध्ये दाखल झाली आहे. ही महिला देखील आपल्या प्रियकराला भेटायला भारतात आली आहे.
कोलकत्ता येथे राहणाऱ्या एका मुलाशी तिचं लग्न ठरलं आहे. तिचं लग्न जरी ठरलं असलं तरी सीमा हैदरप्रमाणे तिच्याकडे देखील संशयाने बघितलं जाणार का?
त्याचबरोबर तिच्यामुळे ( Pakistani Women ) दोन्ही देशात वाद होणार का? असे प्रश्न उपस्थित झाले आहेत.
Javeria Khanam has entered India
कराची येथील रहिवासी जवेरीया खानम नावाची महिला भारतामध्ये दाखल झाली आहे. दोन वेळा तिचा व्हिसा नाकारला गेला होता.
तब्बल पाच वर्ष रखडल्यानंतर तिचा व्हिसा मंजूर करण्यात आला. जानेवारी महिन्यामध्ये ती तिच्या प्रियकरासोबत म्हणजेच कोलकत्यातील समीर खानसोबत लग्न करणार आहे.
दरम्यान, मे 2018 मध्ये या दोघांच्या प्रेमप्रकरणाला सुरुवात झाली होती. समीर खानने त्याच्या आईच्या फोनमध्ये तिचा फोटो पाहिला होता. त्यानंतर त्याला ती अत्यंत आवडली होती. बोलणी झाल्यानंतर दोघांचं लग्न ठरलं.
मात्र कोविड महामारी आणि इतर कारणांमुळे जवेरीयाचा दोनदा व्हिसा नाकारण्यात आला. परंतु यानंतर तिला व्हिसा मिळाला असून ती भारतामध्ये दाखल झाली आहे. येत्या जानेवारीमध्ये दोघेजण लग्न करणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- Bell Pepper Benefits | अनेक रोगांवर उपचार आहे शिमला मिरची; आजच करा आहारात त्याचा समावेश
- Rohit Sharma | “मी तुम्हाला टी-20 वर्ल्ड कपसाठी पाहिजे असेल तर…”; रोहित शर्माने बीसीसीईला स्पष्टच सांगितलं
- IPL 2024 RCB Players List – रॉयल चॅलेंजर्स बंगलोरमध्ये खेळणार ‘हे’ दिग्गज खेळाडू; वाचा खेळाडूंची यादी
- Flight Tips | पहिल्यांदा विमानाने प्रवास करत आहात? तर ‘या’ गोष्टी सोबत ठेवू नका
- Amla Benefits | हिवाळ्यामध्ये करा आवळ्याचे सेवन; होतील ‘या’ समस्या दूर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











