Share

Prakash Ambedkar | भाजपला रोखण्यासाठी सर्वांनी एकत्र यायला हवं – प्रकाश आंबेडकर

Everyone should come together to stop BJP – Prakash Ambedkar

Published On: 

Prakash Ambedkar | सांगली: आगामी निवडणुकांसाठी सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्ष  देखील आगामी निवडणुकांच्या तयारीला लागले आहे.

याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर ( Prakash Ambedkar ) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. भारतीय जनता पक्षाला रोखण्यासाठी सर्वांनी एकत्र यायला हवं, असं प्रकाश आंबेडकर ( Prakash Ambedkar ) यांनी म्हटलं आहे.

Narendra Modi is the ring master of Indian politics – Prakash Ambedkar

प्रकाश आंबेडकर ( Prakash Ambedkar ) म्हणाले, “नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) हे भारताच्या राजकारणातील रिंग मास्टर आहे.

त्यामुळे आपण त्यांना ओळखायला हवं. भारतीय जनता पक्षाला रोखण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र यायला पाहिजे. एकत्र येणं हे आपल्या सर्वांच्या हातात आहे.”

राज्यामध्ये मराठा आरक्षणावरून ओबीसी आणि मराठा समाजामध्ये वाद होताना दिसत आहे. कारण मराठा समाजाने केलेल्या मागणीला ओबीसी समाजाने विरोध दर्शवला आहे.

यानंतर मराठा नेते मनोज जरांगे ( Manoj Jarange ) आणि ओबीसी नेते छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) एकमेकांवर टीका करताना दिसले.

यावेळी बोलत असताना प्रकाश आंबेडकर ( Prakash Ambedkar ) यांनी यावर देखील भाष्य केलं आहे. ते ( Prakash Ambedkar ) म्हणाले, “भाजप सरकारकडून भीती दाखवली जात आहे.

निवडणुकांदरम्यान हिंदू-मुस्लिम समाजामध्ये वाद होईल की नाही, हे सांगता येत नाही. मात्र, ओबीसी आणि मराठा समाजामध्ये वाद सुरू आहे. त्याचबरोबर धनगर आणि आदिवासी समाजामध्ये तेढ निर्माण होताना दिसत आहे

राज्यामध्ये अनेक ठिकाणी दंगलग्रस्त स्थिती निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक पोलीस स्थानकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही