Share

Maratha Reservation | कार्तिकी महापूजेवरून मराठ्यांचे दोन गट; उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजा होणार की नाही?

Maratha Reservation | पंढरपूर: 23 नोव्हेंबर 2023 रोजी कार्तिकी एकादशी साजरी केली जाणार आहे. कार्तिकी एकादशीच्या पूजेचा मान उपमुख्यमंत्र्यांना मिळतो. याच पार्श्वभूमीवर पंढरपुरात सकल मराठा समाजाचे दोन गट पडलेले दिसले आहे. कारण एका गटाने मराठा आंदोलनावरून ( Maratha Reservation ) ही पूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यास विरोध केला आहे. तर दुसऱ्या गटाने उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणाऱ्या शासकीय … Read more

Published On: 

Maratha Reservation | पंढरपूर: 23 नोव्हेंबर 2023 रोजी कार्तिकी एकादशी साजरी केली जाणार आहे. कार्तिकी एकादशीच्या पूजेचा मान उपमुख्यमंत्र्यांना मिळतो.

याच पार्श्वभूमीवर पंढरपुरात सकल मराठा समाजाचे दोन गट पडलेले दिसले आहे. कारण एका गटाने मराठा आंदोलनावरून ( Maratha Reservation ) ही पूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यास विरोध केला आहे. तर दुसऱ्या गटाने उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणाऱ्या शासकीय पूजेला विरोध नसल्याची भूमिका स्पष्ट केली आहे.

The Sakal Maratha Committee started an indefinite strike

मराठा आरक्षणाच्या ( Maratha Reservation ) मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण अत्यंत तापलं आहे. याच पार्श्वभूमीवर पंढरपुरात सकल मराठा समितीने तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलं आहे.

यानंतर मराठा समाजाने उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणाऱ्या कार्तिकी पूजेला विरोध दर्शवला होता. मराठा समाज कालपर्यंत आपल्या भूमिकेवर ठाम होता.

मात्र, आज मराठा समाजाने ( Maratha Reservation ) आपली भूमिका बदललेली असून उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणाऱ्या कार्तिकी पूजेला आमचा विरोध नसल्याची भूमिका सकल मराठा समाजाचे माजी उपाध्यक्ष नागेश भोसले यांनी स्पष्ट केली आहे.

“राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण ( Maratha Reservation ) देण्याबाबत सकारात्मक भूमिका मांडताना दिसत आहे. त्यामुळे कार्तिकी यात्रेच्या निमित्ताने होणाऱ्या शासकीय पूजेला उपमुख्यमंत्र्यांनी यावे.

पांडुरंगाच्या चरणी हात ठेवून मराठा समाजाला आरक्षण ( Maratha Reservation ) देणार असं त्यांनी जाहीर करावं”, असं नागेश भोसले यांनी म्हटलं आहे.

तर दुसरीकडे मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक रामभाऊ गायकवाड यांनी उपमुख्यमंत्र्यांनी कार्तिकी पूजेसाठी पंढरपुरात येऊ नये अन्यथा होणाऱ्या परिणामा सरकार जबाबदार असेल अशी भूमिका मांडली आहे.

अशात मराठा समाजाने मांडलेल्या या दोन्ही भूमिकेनंतर कार्तिकीची पूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार का? असा सवाल उपस्थित झाला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही