🕒 1 min read
Maratha Reservation | पुणे: मराठा समाजाने केलेल्या आरक्षणाच्या मागणीवरून ओबीसी आणि मराठा समाज आमने-सामने आले आहे. कारण मनोज जरांगे यांनी केलेल्या मागणीला छगन भुजबळ यांनी विरोध दर्शवला आहे.
याच पार्श्वभूमीवर काल मराठवाड्यातील जालन्यात ओबीसी समाजाचा भव्य मेळावा पार पडला. या मेळाव्यामध्ये बोलत असताना छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांच्यावर जहरी टीका केली आहे.
तर दुसरीकडे मनोज जरांगे यांनी देखील छगन भुजबळ यांना सडेतोड उत्तर दिलं आहे. या सर्व घडामोडीनंतर अजित पवार गटाने मराठा आरक्षणाच्या ( Maratha Reservation ) मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी पुण्यामध्ये बैठकीचे आयोजन केलं असल्याच्या चर्चा सुरू आहे.
A meeting of Ajit Pawar group was held in Pune
मराठा आरक्षणावरून ( Maratha Reservation ) मंत्री छगन भुजबळ आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये वाद विवाद सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर आज पुण्यामध्ये अजित पवार गटाची बैठक पार पडली.
मराठा आरक्षणाच्या ( Maratha Reservation ) मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली असल्याच्या चर्चा सुरू आहे. छगन भुजबळ यांच्या मेळाव्यानंतर मराठा समाज आणखीन आक्रमक झाला आहे. यावरूनच या बैठकीचं आयोजन केलं असल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान, राज्यामध्ये मराठा आणि ओबीसी समाज आक्रमक होत चालला आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा समाजाच्या मागणीला ( Maratha Reservation ) विरोध केला आहे.
याच पार्श्वभूमीवर पंढरपूर शहरात संतप्त मराठा आंदोलकांनी छगन भुजबळ यांचा पुतळा जाळला आहे. छगन भुजबळांची मंत्री मंडळातून हकलपट्टी करा, अशी मागणी देखील मराठा आंदोलकांनी केली आहे. मराठा आंदोलकांच्या या कृत्यावर ओबीसी समाजाकडून काय प्रतिक्रिया येईल? याकडे आता सर्वांचं लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या
- Maratha Reservation | भुजबळांविरोधात मराठा समाज आक्रमक; जाळला त्यांचा पुतळा
- Manoj Jarange | जर मराठा समाजाच्या नोंदी नव्हत्या, तर आज या नोंदी सापडल्या कशा? – मनोज जरांगे
- Manoj Jarange | मराठा समाजाला आरक्षण मिळणार म्हणून भुजबळ चलबिचल झालेय – मनोज जरांगे
- Maratha Reservation | मराठ्यांना आरक्षण मिळणार? राज्यात तब्बल 29 लाख कुणबी मराठा नोंदी सापडल्या
- Manoj Jarange | आमचा आणि ओबीसी समाजाचा व्यवसाय एकच, मग आम्हाला आरक्षण का नाही? – मनोज जरांगे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











