Share

Maratha Reservation | माझ्या बाळाला न्याय द्या; मराठा आरक्षणावर मनोज जरांगेंच्या आईची भावूक प्रतिक्रिया

Maratha Reservation | जालना: राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. उपोषणकर्ते मनोज जरांगे (Manoj Jarange) गेल्या अकरा दिवसापासून मराठा आरक्षणासाठी उपोषण करत आहे. उपोषणाच्या अकराव्या दिवशी मनोज जरांगे यांची आई उपोषण स्थळी दाखल झाली आहे. उपोषण स्थळी दाखल होताचं जरांगे यांच्या आईने भावूक प्रतिक्रिया दिली आहे. मराठा समाजाला आरक्षण द्या, माझ्या बाळाला न्याय द्या, … Read more

Published On: 

Maratha Reservation | जालना: राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. उपोषणकर्ते मनोज जरांगे (Manoj Jarange) गेल्या अकरा दिवसापासून मराठा आरक्षणासाठी उपोषण करत आहे.

उपोषणाच्या अकराव्या दिवशी मनोज जरांगे यांची आई उपोषण स्थळी दाखल झाली आहे. उपोषण स्थळी दाखल होताचं जरांगे यांच्या आईने भावूक प्रतिक्रिया दिली आहे. मराठा समाजाला आरक्षण द्या, माझ्या बाळाला न्याय द्या, असं मनोज जरांगे यांच्या आईने म्हटलं आहे.

Give justice to my baby – Manoj Jarange mother

मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान मनोज जरांगे यांच्या आई आज उपोषण स्थळी दाखल झाल्या आहे.

उपोषण स्थळी आईला पाहून जरांगे यांना अश्रू अनावर झाले. मराठ्यांना आरक्षण द्या. माझ्या बाळाला न्याय द्या. सर्वांना न्याय द्या. सर्वांचा आशीर्वाद घ्या, असं मनोज जरांगे यांच्या आईने म्हटलं आहे.

दरम्यान, उपोषणाच्या नवव्या दिवशी मनोज जरांगे यांची प्रकृती अत्यंत खालवली होती. त्या दिवशीच आरोग्य विभागाचं एक पथक उपोषण स्थळी दाखल झालं. पुढील तीन दिवस मी औषध आणि सलाईन लावून घेणार असं मनोज जरांगे यांनी त्यावेळी म्हटलं होतं.

त्यानंतर देखील सरकार जरांगे यांची मागणी पूर्ण केलेली नाही. यानंतर मनोज जरांगे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. “माझ्या मागणीनुसार उद्याचा दिवस शेवटचा आहे.

उद्यापर्यंत जर सरकारचा निरोप नाही आला तर मी औषध घेणार नाही आणि सलाईन देखील लावणार नाही. आज दिवसभर आम्ही सरकारच्या निरोपाची वाट बघणार आहोत. मात्र आज सरकारचा निरोप नाही आला तर उद्यापासून मी औषध, पाणी आणि सलाईनचा त्याग करणार आहे”, असं जरांगे यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही