Share

Chandrakant Khaire | महाराष्ट्रात भाजपनं दंगली घडवल्या – चंद्रकांत खैरे

🕒 1 min read Chandrakant Khaire | नांदेड: गेल्या काही महिन्यांपूर्वी राज्यामध्ये अनेक ठिकाणी दंगली झाल्या होत्या. यामध्ये छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, अमरावती, अहमदनगर या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात जाळपोळ आणि तोडफोड झाल्याची दिसून आली होती. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. भारतीय जनता पक्षानं राज्याच्या राजकारणात दंगलीचं राजकारण केलं असल्याचं … Read more

Published On: 

🕒 1 min read

Chandrakant Khaire | नांदेड: गेल्या काही महिन्यांपूर्वी राज्यामध्ये अनेक ठिकाणी दंगली झाल्या होत्या. यामध्ये छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, अमरावती, अहमदनगर या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात जाळपोळ आणि तोडफोड झाल्याची दिसून आली होती.

याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. भारतीय जनता पक्षानं राज्याच्या राजकारणात दंगलीचं राजकारण केलं असल्याचं चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं आहे.

BJP is playing riot politics in Maharashtra – Chandrakant Khaire

नांदेडमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधत असताना चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) म्हणाले, “महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष दंगलीचं राजकारण करत आहे.

राज्यात महाविकास आघाडीसोबत दलित आणि मुस्लिम बांधव येऊ नये, म्हणून भाजपनं हे सर्व केलं आहे. महाविकास आघाडीला मुस्लिम आणि दलितांचा पाठिंबा मिळू नये म्हणून हे केलं जात आहे.

आतापर्यंत राज्यात सात दंगली घडल्या आहे आणि हे भाजपचं कटकारस्थान आहे. हिंदू-मुस्लिम यांना भडकवायचं आणि जातीय तेढ निर्माण करायची, ही भारतीय जनता पक्षाची भूमिका आहे.”

दरम्यान, चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. या चर्चा सुरू असताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याबद्दल एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

संजय राऊत आगामी लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“पक्षानं सांगितलं तर आम्ही काहीही करू शकतो. पक्षानं आदेश दिला तर आम्ही तुरुंगात जातो. पक्षाची गरज, पक्षाचा आदेश आणि पक्षप्रमुखांचा आदेश जो असेल तो मानणाऱ्यांपैकी आम्ही आहोत. त्यामुळं पक्षांनं जर आदेश दिला तर मी निवडणुका देखील लढू शकतो.”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही