Share

Sanjay Raut | “भाजपसोबत असणाऱ्यांना कर्जमाफी दिली…”; नितीन देसाईंच्या आत्महत्येवर संजय राऊतांची प्रतिक्रिया

Sanjay Raut | नवी दिल्ली: सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक आणि कर्जत एनडी स्टुडिओचे मालक नितीन देसाई (Nitin Desai) यांनी काल (2 ऑगस्ट) आत्महत्या केली आहे. त्यांच्या डोक्यावर 249 कोटी रुपयांचं कर्ज झाल्यामुळं त्यांनी आत्महत्या केली असल्याची माहिती मिळाली आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणावर बोलत असताना संजय राऊत … Read more

Published On: 

Sanjay Raut | नवी दिल्ली: सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक आणि कर्जत एनडी स्टुडिओचे मालक नितीन देसाई (Nitin Desai) यांनी काल (2 ऑगस्ट) आत्महत्या केली आहे.

त्यांच्या डोक्यावर 249 कोटी रुपयांचं कर्ज झाल्यामुळं त्यांनी आत्महत्या केली असल्याची माहिती मिळाली आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणावर बोलत असताना संजय राऊत यांनी भाजप सरकारवर खोचक टीका केली आहे.

Nitin Desai has made his mark in the film industry – Sanjay Raut

संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, “नितीन देसाई यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा सिनेइंडस्ट्रीमध्ये उमटवला आहे. त्यांनी देशात एनडी स्टुडिओसारखा एक भव्य स्टुडिओ उभारला आहे.

त्याचबरोबर त्यांनी अनेक चित्रपटांची निर्मिती केली आहे. अशा मोठ्या कलाकाराचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आपल्यासमोर आपलं स्वप्न उध्वस्त होताना दिसत होतं, म्हणून नितीन देसाई यांनी आत्महत्या केली आहे.

पुढे बोलताना ते (Sanjay Raut) म्हणाले, “देशात एका बाजूला काही लोक हजारो कोटी रुपयांचा घोटाळा करून पळून जात आहे. तर काही लोक बँकांना बुडवत आहे.

भाजपसोबत असणाऱ्या लोकांना कर्जमाफी दिली. त्याचबरोबर त्या लोकांवर कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही. मात्र, एक मराठी कलाकार शे-दीडशे कोटी रुपयांचं कर्ज फेडू शकला नाही.

नितीन देसाईंना त्यांचं स्वप्न म्हणजेच एनडी स्टुडिओ उध्वस्त होताना दिसत होता. हे त्यांना सहन झालं नाही म्हणून त्यांनी आत्महत्या केली. नितीन देसाई देश सोडून गेले नाही. त्याचबरोबर त्यांनी कोणाला फसवलं नाही, हे महत्त्वाचं आहे.”

दरम्यान, कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी काल एनडी स्टुडिओमध्ये गळफास लावून आत्महत्या केली आहे. नितीन देसाई यांनी अनेक मालिकांसह चित्रपटाचे कला दिग्दर्शन केले आहे.

1942 मध्ये ‘अ लव्ह स्टोरी’ या चित्रपटापासून त्यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात केली होती. ‘किक’, ‘जोधा अकबर’, ‘बालगंधर्व’, ‘बाजीराव मस्तानी’, ‘प्रेम रतन धन पायो’ इत्यादी चित्रपटांसाठी नितीन देसाई यांनी कला दिग्दर्शन केले होते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही