Sharad Pawar | शरद पवारांनी बोलवली महाविकास आघाडीची बैठक; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Sharad Pawar | टीम महाराष्ट्र देशा: आज लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. या पुरस्कार सोहळ्याच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. शरद पवारांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहू नये, असं मत महाविकास आघाडीतील नेत्यांनी … Read more

Published On: 

Sharad Pawar | टीम महाराष्ट्र देशा: आज लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

या पुरस्कार सोहळ्याच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार एकाच व्यासपीठावर उपस्थित होते.

शरद पवारांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहू नये, असं मत महाविकास आघाडीतील नेत्यांनी व्यक्त केलं होतं. मात्र, तरीही शरद पवार या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यानंतर आता शरद पवारांनी महाविकास आघाडीची बैठक बोलवली आहे.

Sharad Pawar has called a meeting of Mahavikas Aghadi in Mumbai

महाविकास आघाडीतील नेत्यांची इच्छा नसताना शरद पवारांनी (Sharad Pawar) आजच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम सुरू असताना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पुण्यामध्ये आंदोलन केलं.

यानंतर शरद पवारांनी मुंबईमध्ये महाविकास आघाडीची बैठक बोलवली आहे. 05 ऑगस्ट रोजी ही बैठक होणार आहे. या बैठकीला शरद पवार यांच्यासह उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), नाना पटोले (Nana Patole) आदी नेते उपस्थित राहतील. आज घडलेल्या घटनेनंतर महाविकास आघाडीच्या या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. मोदींना पुरस्कार मिळाल्यानंतर शरद पवार यांनी भाषण केलं.

यावेळी बोलत असताना शरद पवारांचा (Sharad Pawar) रोख छत्रपती शिवाजी महाराज आणि लोकमान्य टिळक यांच्या योगदानावर होता. तर पवारांनी भाषणाच्या शेवटी एका ओळीत नरेंद्र मोदी यांचा उल्लेख करत त्यांचं अभिनंदन केलं.

महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

पत्रकार

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही