Share

Sanjay Raut | संजय राऊत शरद पवारांवर नाराज? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Sanjay Raut | टीम महाराष्ट्र देशा: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) उद्या (01 ऑगस्ट) पुणे दौऱ्यावर येणार आहे. लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने नरेंद्र मोदींना ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे. यासाठी पंतप्रधान मोदी उद्या पुण्यात दाखल होणार आहे. या पुरस्कार सोहळ्यानिमित्त नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad … Read more

Published On: 

Sanjay Raut | टीम महाराष्ट्र देशा: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) उद्या (01 ऑगस्ट) पुणे दौऱ्यावर येणार आहे. लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने नरेंद्र मोदींना ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे.

यासाठी पंतप्रधान मोदी उद्या पुण्यात दाखल होणार आहे. या पुरस्कार सोहळ्यानिमित्त नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) एकाच व्याजपीठावर दिसणार आहे.

Narendra Modi and Sharad Pawar will be seen on the same stage

नरेंद्र मोदी पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने पुण्यामध्ये येणार आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार देखील उपस्थित राहणार आहे.

याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहे. महाविकास आघाडीवर होणारे वार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर शरद पवारांनी उद्याच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणं योग्य ठरणार नसल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यामुळे संजय राऊत शरद पवारांवर नाराज असल्याचं बोललं जात आहे.

शरद पवारांनी या कार्यक्रमाला हजेरी लावू नये, असं मत महाविकास आघाडीतील नेत्यांनी मांडलं आहे. त्याचबरोबर शरद पवार गटातील नेते देखील यामुळे नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहे.

आता शरद पवार या कार्यक्रमाला उपस्थिती लावणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले (Sanjay Raut) आहे.

दरम्यान, शरद पवारांनी मोदींसोबत एका मंचावर बसू नये. त्याचबरोबर पवारांनी या कार्यक्रमाला जाऊ नये, अशी विनंती पुण्यातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडे करणार असल्याची माहिती मिळाली आहे.

महाविकास आघाडीतील काही नेते शरद पवारांची भेट घेऊन या संदर्भात त्यांच्यासोबत चर्चा करणार असल्याचं बोललं (Sanjay Raut) जात आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही