Share

Sharad Pawar | शरद पवारांची मोठी घोषणा! सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी

Sharad Pawar | दिल्ली: आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 25 वा वर्धापन दिन साजरा केला जात आहे. वर्धापन दिनानिमित्त राजधानी दिल्लीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम सुरू आहे. या कार्यक्रमादरम्यान शरद पवार यांनी मोठी घोषणा केली आहे. Sunil Tatkare has been given the post … Read more

Published On: 

Sharad Pawar | दिल्ली: आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 25 वा वर्धापन दिन साजरा केला जात आहे. वर्धापन दिनानिमित्त राजधानी दिल्लीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम सुरू आहे. या कार्यक्रमादरम्यान शरद पवार यांनी मोठी घोषणा केली आहे.

Sunil Tatkare has been given the post of General Secretary

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनी शरद पवार (Sharad Pawar) यांनी मोठी घोषणा केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांची निवड करण्यात आली आहे. या दोघांकडे वेगवेगळ्या राज्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्याचबरोबर खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांना सरचिटणीस पद देण्यात आलं आहे.

सुप्रिया सुळे यांच्याकडे महाराष्ट्र, पंजाब आणि हरियाणा या राज्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर प्रफुल्ल पटेल यांच्याकडे राजस्थान, गुजरात, झारखंड आणि मध्य प्रदेश राज्याची जबाबदारी दिली आहे.

Supriya Sule and Praful Patel working president of NCP – Sharad Pawar 

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) , खासदार प्रफुल्ल पटेल (Praful Patel), खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule), खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) हे सगळे दिल्लीत उपस्थित आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही