वर्कलोड व्यवस्थापनासाठी ट्रॅव्हिस हेडची आयपीएल २०२७ मधून माघार; सनरायझर्स हैदराबादला मोठा धक्का

वर्कलोड कमी करण्यासाठी ट्रॅव्हिस हेड आयपीएल २०२७ मध्ये खेळण्याची शक्यता नाही. त्यामुळे सनरायझर्स हैदराबादला नव्या सलामीवीराचा शोध घ्यावा लागणार आहे.

Published On: 

Travis Head in cricket jersey

प्रतिनिधी, 18 नोव्हेंबर: ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा सलामीवीर ट्रॅव्हिस हेड आगामी आयपीएल २०२७ च्या हंगामात खेळण्याची शक्यता नाही. सध्या सर्व संघ त्यांच्या ‘रिटेन्शन’ याद्या तयार करण्याच्या तयारीत आहेत आणि परदेशी खेळाडूंबाबत महत्त्वाचे निर्णय घेत आहेत. अशातच हेडच्या या निर्णयामुळे सनरायझर्स हैदराबाद (SRH) फ्रँचायझीची अडचण वाढली असून त्यांना मोठा धक्का बसला आहे.

‘आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या व्यग्र वेळापत्रकातून वर्कलोड कमी करण्यासाठी आगामी आयपीएल २०२७ मधून माघार घेत असल्याचे’ ट्रॅव्हिस हेडने सनरायझर्स हैदराबादला कळवले आहे.

सुरुवातीपासूनच आक्रमक फलंदाजी करत विरोधी गोलंदाजांवर दबाव निर्माण करण्याच्या क्षमतेमुळे ट्रॅव्हिस हेड हैदराबादच्या फलंदाजीचा एक महत्त्वाचा भाग राहिला आहे. त्याच्या या संभाव्य अनुपस्थितीमुळे आयपीएलच्या आगामी हंगामापूर्वी फ्रँचायझीला नव्या सलामीच्या जोडीचा शोध घ्यावा लागणार आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही