🕒 1 min read
पुणे – पहिल्या वनडेसाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे, पण कॅप्टन कोण? आणि कोण बसणार बाहेर? हा प्रश्न तमाम क्रिकेट चाहत्यांना पडला होता. अखेर या सस्पेन्सवरून पडदा उठला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वनडेसाठी भारतीय संघात काही धक्कादायक, तर काही सुखावणारे बदल बघायला मिळत आहेत. विशेष म्हणजे, शुबमन गिल (Shubman Gill) याच्या खांद्यावर नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली असून, ‘हिटमॅन’ रोहित शर्मा त्याला सलामीला साथ देणार आहे.
Shubman Gill – IND vs NZ Playing 11
रविवारी होणाऱ्या या हाय-व्होल्टेज सामन्यात विजयाचा श्रीगणेशा करण्यासाठी टीम इंडियाने कंबर कसली आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील तुफान फॉर्मनंतर विराट कोहली पुन्हा एकदा मैदानात आग ओकायला सज्ज आहे.
बॅटिंग ऑर्डरमध्ये ‘हा’ मोठा बदल!
डावाची सुरुवात शुबमन गिल आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) ही जोडी करेल. विराट कोहली (Virat Kohli) नेहमीप्रमाणे तिसऱ्या क्रमांकावर येईल. आफ्रिकेत त्याने केलेली कमाल चाहत्यांच्या अजूनही लक्षात आहे. चौथ्या क्रमांकासाठी श्रेयस अय्यरचं नाव चर्चेत आहे, पण त्याची फिटनेस टेस्ट महत्त्वाची ठरेल. जर तो फिट असेल, तर पाचव्या क्रमांकावर के.एल. राहुल आपली जबाबदारी सांभाळेल.
हार्दिक नाही, मग ऑलराऊंडर कोण?
सर्वात मोठी बातमी म्हणजे हार्दिक पांड्याला या मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे त्याच्या जागी अष्टपैलू नितीश कुमार रेड्डी (Nitish Kumar Reddy) याला प्लेइंग ११ मध्ये स्थान मिळण्याची दाट शक्यता आहे. नितीशसाठी ही मोठी संधी असेल, हे नक्की.
गोलंदाजीत कोणाचं नाणं खणखणणार?
गोलंदाजीची मदार अनुभवी मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) आणि अर्शदीप सिंग यांच्यावर असेल. त्यांना साथ देण्यासाठी युवा वेगवान गोलंदाज हर्षित राणा सज्ज आहे. तर फिरकीच्या जाळ्यात किवींना अडकवण्यासाठी कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा ही जोडी सज्ज असेल. थोडक्यात काय, तर न्यूझीलंडच्या फलंदाजांची पळता भुई थोडी करण्यासाठी भारतीय गोलंदाज पूर्ण ताकदीने उतरणार आहेत.
आता पाहायचं हे की, कॅप्टन शुबमन गिलच्या (Shubman Gill) नेतृत्वाखाली टीम इंडिया विजयाचं खातं उघडणार का?
India Probable XI: शुबमन गिल (c), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, के.एल. राहुल (wk), रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज.
📌 महत्वाच्या बातम्या
- IND vs NZ: भारताला धूळ चारण्यासाठी न्यूझीलंडचा ‘हा’ आहे गेमप्लॅन; Playing 11 मध्ये मोठे बदल!
- किंग कोहलीचा ‘विराट’ विक्रम; फक्त २५ धावा करताच सचिन तेंडुलकरला टाकणार मागे!
- रोहित शर्मा पुन्हा कॅप्टन होणार? जय शाह यांनी भर कार्यक्रमात फोडला बॉम्ब; ‘हितमॅन’ची रिॲक्शन बघण्यासारखी!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now










