Sharad Pawar : तुम्ही काही काळजी करू नका. आपल्याला लांब जायचंय, 84 होवो की 90 होवो हा म्हातारा काही थांबत नाही, असे वक्तव्य शरद पवारांनी फलटण ( सातारा ) येथील सभेत केले केले आहे.
रामराजे नाईक निंबाळकर यांचे बंधू संजीवराजे निंबाळकर आणि त्यांचे सुपुत्र अनिकेत निंबाळकर यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.
काही तरुण मुले हातात बोर्ड घेऊन उभे होते. त्यात माझा फोटो होता. त्यात लिहिले होते की, 84 वर्षांचा म्हातारा. तुम्ही काही काळजी करू नका. आपल्याला लांब जायचंय, 84 होवो की 90 होवो हा म्हातारा काही थांबत नाही. हे म्हातारं महाराष्ट्राला योग्य रस्त्यावर आणल्याशिवाय थांबत नाही. संपूर्ण देशात तुतारीचा आवाज आल्याशिवाय राहणार नाही, असे म्हणत शरद पवारांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केलाय.
आज चुकीच्या हातात सत्ता आहे. आज महाराष्ट्रात अत्याचार होत आहेत. शाळेत लहान मुलीवर अत्याचार झाला. काल एका माजी मंत्र्यांची हत्या झाली. सामान्य माणूस आणि आया बहिणींना सुरक्षिततेने जगता येत नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे उद्घाटन झाले. आठ महिन्यात पुतळा कोसळला. साठ वर्ष होऊन गेली तरी यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते अनावरण झालेल्या पुतळ्याला काही झालं नाही.
८४ होवो, ९० होवो हे म्हातारं काही थांबत नाही; हे म्हातारं…! – Sharad Pawar ( फलटण सातारा सभा )
महत्वाच्या बातम्या