Share

Share Market Crash: शेअर बाजारात होळी; ३.६३ लाख कोटी स्वाहा! ‘या’ कंपनीला मोठा फटका

शेअर बाजारात मोठी पडझड झाली असून रिलायन्स आणि एचडीएफसीसह ७ बड्या कंपन्यांचे ३.६३ लाख कोटी रुपये बुडाले आहेत. गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आहे.

Published On: 

Sensex Crash Update 2026

🕒 1 min read

मुंबई – शेअर बाजारात (Share Market) कधी दिवाळी असते तर कधी दिवाळं निघतं, याचा जबर प्रत्यय गुंतवणूकदारांना नुकताच आलाय. नववर्षाच्या दुसऱ्याच आठवड्यात बाजारात अशी काही सुनामी आली की, बड्या कंपन्याही कोलमडून पडल्या. सेन्सेक्सवरील टॉप १० पैकी तब्बल ७ दिग्गज कंपन्यांचं कंबरडं मोडलं असून, अवघ्या ५ दिवसांत गुंतवणूकदारांचे ३.६३ लाख कोटी रुपये पाण्यात गेले आहेत. या पडझडीत देशातील सर्वात श्रीमंत कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजला सर्वाधिक फटका बसला आहे.

Sensex Crash Update 2026

कुणाचे किती पैसे बुडाले?

गेल्या आठवड्यात बीएसई सेन्सेक्स (BSE Sensex) तब्बल २१८५ अंकांनी खाली आला. याची सर्वाधिक झळ मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजला (Reliance Industries) बसली. रिलायन्सचं बाजारमूल्य १५८,५३२ कोटी रुपयांनी घटून १९,९६,४४५ कोटींवर आलं आहे. त्या खालोखाल बँकिंग क्षेत्रातील दिग्गज HDFC बँकेला फटका बसला असून, त्यांचे ९६,१५३ कोटी रुपये कमी झाले आहेत.

केवळ रिलायन्स आणि एचडीएफसीच नाही, तर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS), इन्फोसिस, भारती एअरटेल, बजाज फायनान्स आणि एल अँड टी (L&T) या कंपन्यांच्या शेअरमध्येही मोठी घसरण झाली. टीसीएसचे १५ हजार कोटी तर एअरटेलचे ४५ हजार कोटी रुपये बाजारातून साफ झाले आहेत.

एकीकडे बाजारात होळी होत असताना, दुसरीकडे काही शेअर्सनी मात्र हिरवा कंदील दाखवला. ICICI बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) या पडत्या काळातही नफा कमावण्यात यशस्वी ठरल्या. ICICI बँकेच्या बाजारमूल्यात ३४,९०१ कोटींची वाढ झाली आहे. दरम्यान, येत्या आठवड्यात १३ आणि १४ जानेवारीला गॅबियन टेक्नोलॉजीज आणि विक्टरी इलेक्ट्रिक वेईकलसारखे नवीन शेअर्स लिस्ट होणार असल्याने बाजाराची नजर आता तिकडे वळली आहे.

(टीप: शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमीची असते. गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.)

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
⚠️ बातमी पूर्ण दिसत नाहीये?

चांगल्या अनुभवासाठी Chrome/Safari मध्ये उघडा.

👉 Chrome मध्ये उघडा (Click Here)