Share

संभाजीनगरमध्ये भाजपचा ‘गेम’; २२ बंडखोरांची थेट हकालपट्टी! ११ जण शिंदेंच्या गळाला, तर ‘जुने’ पुन्हा रिंगणात

BJP expels 22 rebel leaders in Sambhajinagar, 11 of whom joined Shinde Sena. 97 ex-corporators are re-contesting.

Published On: 

eknath shinde mask of rss bjp

🕒 1 min read

छत्रपती संभाजीनगर- राजकारणात मित्र कोण आणि शत्रू कोण, हे आता कळायला मार्ग उरला नाहीये. छत्रपती संभाजीनगरमध्ये ( Sambhajinagar Election ) भाजप आणि शिंदे सेनेची युती कागदावर असली तरी आतून मात्र जोरदार ‘काटाकाटी’ सुरू आहे. भाजपने आपल्या आदेशाला केराची टोपली दाखवणाऱ्या तब्बल २२ बंडखोर पदाधिकारांची थेट हकालपट्टी केली आहे. धक्कादायक म्हणजे, यातील ११ जणांनी चक्क मित्रपक्ष असलेल्या शिंदे सेनेचा झेंडा हाती घेत उमेदवारी मिळवली आहे. त्यामुळे ही युती आहे की कुस्ती, असा प्रश्न पडलाय.

९७ माजी नगरसेवक पुन्हा मैदानात

एकीकडे बंडखोरीचं वारं वाहत असताना, दुसरीकडे जुन्याच चेहऱ्यांनी पुन्हा एकदा शड्डू ठोकले आहेत. या निवडणुकीत तब्बल ९७ माजी नगरसेवक पुन्हा नशीब आजमावत आहेत. यात भाजपकडून सर्वाधिक ३७, शिंदे गटाकडून १९ तर उद्धव सेनेकडून १८ माजी नगरसेवक रिंगणात आहेत. काही ठिकाणी स्वतःला तिकीट नाही म्हणून नातेवाईकांना उभं करून ‘घराणेशाही’ जपली जात आहे.

दिग्गजांच्या सभांचा धुराळा आता उडणार… 

हे राजकीय वातावरण तापवण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवारी (८ जाने.) शहरात ‘टॉक शो’च्या माध्यमातून तज्ज्ञांशी संवाद साधणार आहेत. तर शनिवारी (१० जाने.) उद्धव ठाकरे यांची तोफ मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर धडाडणार आहे. इतकेच नाही तर एमआयएमचे असदुद्दीन ओवेसी (७ जाने.) आणि वंचितचे सुजात आंबेडकर (८ जाने.) यांच्याही सभांनी शहरात राजकीय पारा चढणार आहे. त्यामुळे पुढचे काही दिवस संभाजीनगरचं राजकारण चांगलंच तापणार, हे नक्की!

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या

⚠️ बातमी पूर्ण दिसत नाहीये?

चांगल्या अनुभवासाठी Chrome/Safari मध्ये उघडा.

👉 Chrome मध्ये उघडा (Click Here)