🕒 1 min read
मुंबई – खिशात रोकड आहे ना? किंवा एखाद्याला महत्त्वाचा चेक द्यायचा राहिलाय? असं असेल तर वेळीच सावध व्हा, कारण तुमची आर्थिक कोंडी होण्याची शक्यता आहे. देशभरातील बँक ग्राहकांसाठी एक महत्त्वाची आणि धडकी भरवणारी बातमी समोर आली आहे. येत्या काही दिवसांत बँकांचे कामकाज सलग तीन दिवस ठप्प राहण्याची शक्यता असल्याने आतापासूनच नियोजन करणं शहाणपणाचं ठरेल.
Bank Strike Alert 2026
नेमकं काय घडलंय?
बँक कर्मचारी युनियन्सने आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी २७ जानेवारी २०२६ रोजी देशव्यापी संपाचा (Bank Strike) इशारा दिला आहे. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (UFBU) च्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पुकारण्यात येणार आहे. २५ जानेवारीला रविवार आहे आणि २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनाची सुट्टी आहे. जर २७ तारखेला संप झाला, तर बँका सलग तीन दिवस बंद राहतील. याचा मोठा फटका सामान्य नागरिक आणि व्यापाऱ्यांना बसू शकतो.
पाच दिवसांचा आठवडा का अडकला?
कर्मचाऱ्यांची मुख्य मागणी ‘पाच दिवसांचा आठवडा’ (5 Days Banking) हीच आहे. युनियनच्या म्हणण्यानुसार, मार्च २०२४ मध्येच यावर सहमती झाली होती, पण सरकार आणि बँक प्रशासनाने अजूनही अंमलबजावणी केलेली नाही. “आम्ही सोमवार ते शुक्रवार जास्तीचे तास काम करायला तयार आहोत, पण शनिवारची सुट्टी हवीच,” अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.
इतकेच नाही तर… बँक कर्मचारी युनियनने एक महत्त्वाचा तर्क मांडला आहे. जर आरबीआय (RBI), एलआयसी (LIC) आणि सरकारी कार्यालये पाच दिवस काम करू शकतात, तर बँकांना वेगळा न्याय का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. जर हा संप झालाच, तर एटीएममध्ये खडखडाट होऊ शकतो आणि चेक क्लिअरन्सची कामं लटकू शकतात. त्यामुळे बँकेची कामं २५ जानेवारीपूर्वीच उरकून घेणं सोयीस्कर ठरेल.
📌 महत्वाच्या बातम्या
- “आता अधिकारी होणारच!”; MPSCचा लाखो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा, ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज!
- वेगवेगळ्या शोकसभा अन् ‘ते’ तर्क-वितर्क; धर्मेंद्र यांच्या निधनानंतर देओल कुटुंबात दुफळी? हेमा मालिनींनी सोडलं मौन!
- “भाजपने २० वर्षांच्या निष्ठेची ‘ती’ परतफेड केली…”; डोंबिवलीच्या इन्फ्लुएन्सरचा संताप, अखेर राज ठाकरेंनी दिला आधार!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











