Share

“देवाच्या नावाखाली ६० हजार कोटींचा डल्ला?”; राजू शेट्टींचा फडणवीसांवर सर्वात मोठा ‘बॉम्ब’!

“शक्तीपीठ महामार्ग विकासासाठी नाही, तर ६० हजार कोटींचा डल्ला मारण्यासाठी आहे.” राजू शेट्टींचा फडणवीसांवर घणाघात. खर्चाच्या आकड्यांवरून उपस्थित केले गंभीर प्रश्न.

Published On: 

Raju Shetti vs Devendra Fadnavis

🕒 1 min read

कोल्हापूर– विकासकामांच्या नावाखाली नेमकं चाललंय तरी काय? देवाच्या नावाचा वापर करून हजारो कोटींचा ‘ढपला’ पाडण्याचा डाव आहे का? असा खळबळजनक सवाल आता थेट कोल्हापूर मधून उपस्थित झालाय. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप करत शक्तीपीठ महामार्गाचं ‘वस्त्रहरण’ केलं आहे. “शक्तीपीठ महामार्ग हा विकासाचा नसून ६० हजार कोटींचा भ्रष्टाचार करण्याचा घाट आहे,” असा घणाघात शेट्टींनी (Raju Shetty) केला आहे.

राजू शेट्टी यांनी महायुती सरकारच्या ‘ड्रीम प्रोजेक्ट’ची पोलखोल केली आहे. ते म्हणाले, “मुठभर लोकांच्या हितासाठी ढीगभर जनतेला वेठीस धरू नका. गडचिरोलीतील खनिजं आणि काही स्टील कंपन्यांच्या मालवाहतुकीसाठी हा अट्टाहास सुरू आहे. देवाचं नाव फक्त जनतेची दिशाभूल करण्यासाठी वापरलं जातंय.”

खर्चाचं गणित मांडत सरकारला कोंडीत पकडलं!

राजू शेट्टींनी सादर केलेली आकडेवारी कोणाचेही डोळे उघडणारी आहे. केंद्र सरकारने नाशिक-अक्कलकोट या ३७४ किमी महामार्गासाठी १९,१४२ कोटी मंजूर केले, म्हणजे ५१ कोटी रुपये प्रति किमी खर्च. पण शक्तीपीठ महामार्गाच्या ८०३ किमीसाठी तब्बल १ लाख कोटी रुपये खर्च का? इथे एका किमीला १२४ कोटी रुपये खर्च दाखवला जात आहे. “दोन्ही महामार्ग सारखेच असताना, शक्तीपीठसाठी प्रति किमी ७३ कोटी रुपये जादा का? हा ६० हजार कोटींचा मलाईदार व्यवहार कोणासाठी?” असा थेट सवाल त्यांनी (Raju Shetty) मुख्यमंत्र्यांना विचारला आहे.

“महामार्ग नको, रेल्वे द्या!”

जर सरकारला खरंच Marathwada आणि विदर्भाचा विकास करायचा असेल, तर अस्तित्वात असलेल्या रत्नागिरी-नागपूर महामार्गाचं सहापदरीकरण करा, असा पर्याय शेट्टींनी दिला. “शक्तीपीठपेक्षा विदर्भ आणि कोकणाला जोडणारा ‘कोल्हापूर ते वैभववाडी’ हा रेल्वेमार्ग तातडीने पूर्ण करा. यामुळे प्रवाशांचा फायदा होईल. पण सरकारला ते नकोय, कारण त्यांना ९० वर्षे जनतेच्या मानगुटीवर टोलचा भुर्दंड बसवायचा आहे,” अशी टीकाही त्यांनी केली. सांगली आणि कोल्हापूरला पुन्हा पुराच्या पाण्यात बुडवण्याचा हा डाव असल्याचा इशाराही त्यांनी (Raju Shetty) दिला आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या

⚠️ बातमी पूर्ण दिसत नाहीये?

चांगल्या अनुभवासाठी Chrome/Safari मध्ये उघडा.

👉 Chrome मध्ये उघडा (Click Here)