🕒 1 min read
डोंबिवली – राजकारणात निष्ठेला आता किती किंमत उरली आहे? हा प्रश्न सध्या डोंबिवलीत प्रत्येकजण विचारतोय. २० वर्षे पक्षासाठी रक्ताचं पाणी केलं, पण तिकीट वाटपाच्या वेळी मात्र ‘एका रात्रीत’ गेम झाला. डोंबिवलीतील भाजपचे निष्ठावंत शैलेश आणि मनीषा धात्रक यांच्यासोबत घडलेल्या या प्रकाराने कल्याण-डोंबिवलीच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या अन्यायाला त्यांची मुलगी आणि प्रसिद्ध इन्फ्लुएन्सर पूजा धात्रक (Pooja Dhatrak) हिने सोशल मीडियावर वाचा फोडली असून, “भाजपने आमच्याशी गद्दारी केली,” असा गंभीर आरोप तिने केला आहे.
Pooja Dhatrak accuses BJP of betrayal
नेमकं काय घडलं?
शैलेश आणि मनीषा धात्रक यांना भाजपकडून उमेदवारी मिळणार, हे जवळपास निश्चित होतं. २८ डिसेंबरला त्यांना ‘एबी फॉर्म’ भरण्याची तयारी करा, असा निरोपही आला होता. पण २९ डिसेंबरच्या मध्यरात्री अचानक चित्र पालटलं. काँग्रेसमधून आलेल्या आयारामांना खुश करण्यासाठी भाजपने या निष्ठावंत जोडप्याचं तिकीट कापलं.
“आम्ही हार मानणाऱ्यातले नाही…” पूजा धात्रक व्हिडिओमध्ये म्हणते, “माझ्या आई-वडिलांनी २० वर्षे भाजपला दिली. पण त्यांना फक्त खोटी आश्वासनं मिळाली. नवीन लोकांना खुश करण्यासाठी भाजपने आम्हाला डावललं.”
भाजपने नाकारलं तरी धात्रक कुटुंब थांबलं नाही. जिथे भाजपची दारे बंद झाली, तिथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) धावून आले. ३० डिसेंबरला शैलेश आणि मनीषा धात्रक यांनी मनसेच्या (MNS) तिकीटावर उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पूजाच्या या धाडसी व्हिडिओवर नेटकऱ्यांनी “तुझ्यात खूप हिंमत आहे,” म्हणत पाठींबा दर्शवला आहे. आता या निवडणुकीत डोंबिवलीकर निष्ठावंतांच्या बाजूने कौल देतात की आयारामांच्या, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
📌 महत्वाच्या बातम्या
- “नार्वेकरांनी ‘मवाली’सारखी दमदाटी केली, त्यांच्यावर गुन्हा दाखल कराच!”; काँग्रेसचा एल्गार, राष्ट्रपतींकडेही केली मोठी मागणी
- RCB ला मोठा धक्का, एलिस पेरीने मैदान सोडलं! WPL सुरू होण्याआधीच ३ स्टार खेळाडूंची माघार
- “एका खेळाडूला सांभाळू शकत नाही, अख्खी टीम काय…”; बांगलादेशने बीसीसीआयची ‘इज्जत’ काढली, थेट वर्ल्ड कपवर बहिष्कार?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now










