🕒 1 min read
Maratha Reservation | टीम महाराष्ट्र देशा: राज्यात मराठा समाजाचं आरक्षणासाठी तीव्र आंदोलन सुरू आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी उपोषणकर्ते मनोज जरांगे जालना जिल्ह्यात उपोषणाला बसले होते.
अशात मनोज जरांगे यांना मराठा आरक्षणाची कायदेशीर बाजू समजून सांगण्यासाठी आणि उपोषण मागे घेण्याची विनंती करण्यासाठी राज्य सरकार शिष्टमंडळ काल उपोषण स्थळी दाखल झालं होतं.
राज्य शासनाच्या शिष्टमंडळाने केलेल्या विनंतीनंतर मनोज जरांगे यांनी तब्बल नऊ दिवसानंतर आपलं उपोषण मागे घेतलं. त्यांनी आपलं उपोषण मागे घेतलं असलं तरी त्यांचं आंदोलन सुरू राहणार आहे. याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे.
Manoj Jarange commented on Maratha Reservation
मनोज जरांगे म्हणाले, “राज्य सरकारचं आम्हाला नाक दाबायचं आहे. त्यांनी जर मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) दिलं नाही तर आम्ही मुंबईत चक्काजाम करू. त्यानंतर त्यांना घराचं दार देखील उघडता येणार नाही.
त्यांनी जर मराठा आरक्षणावर तोडगा नाही काढला तर आम्ही त्यांच्या आर्थिक, सामाजिक, औद्योगिक, व्यावसायिक सगळ्या वाहिन्या बंद करू. मुंबईमध्ये आम्ही 4 कोटी पेक्षा अधिक लोक दाखल होऊन मुंबई जाम करू.
मराठा आरक्षणावर (Maratha Reservation) निर्णय घेण्यासाठी राज्य शासनाला वेळ पाहिजे. ही गोष्ट लक्षात घेत आम्ही त्यांना वेळ दिला आहे. 24 डिसेंबर पर्यंत राज्य सरकारने आम्हाला आरक्षण दिलं नाही तर आम्ही त्यांना कोर्टात ओढू.”
दरम्यान, मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला मराठा आरक्षणासोबतच (Maratha Reservation) आणखीन एक अट घातली आहे. “जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत एकही नोकरी भरती करायची नाही, असं मी राज्य सरकारला सांगितलं आहे.
राज्य शासनाने आमची ही मागणी मान्य केलेली आहे. परंतु, तरी देखील सरकारने या काळात कोणत्याही प्रकारची भरती केली तर ते मराठा समाजासाठी राखीव जागा ठेवणार आहे.
त्यांनी जर खरंच मराठा समाजासाठी राखीव जागा ठेवल्या तर मराठा समाजाला एक प्रकारचं आरक्षण (Maratha Reservation) मिळेल”, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- Manoj Jarange | मराठा आरक्षण मिळेपर्यंत कोणतीही नोकरीभरती करू नका – मनोज जरांगे
- Devendra Fadnavis | फडणवीस-जरांगे आमने-सामने; मनोज जरांगेंनी उपोषण सोडल्यावर देवेंद्र फडणवीस म्हणतात…
- Manoj Jarange | उपोषण मागे घेतल्यानंतर मनोज जरांगे रुग्णालयात दाखल; पाहा जरांगेंची हेल्थ अपडेट
- Maratha Reservation | नागरिकांना दिलासा; मनोज जरांगेंनी उपोषण मागे घेतल्यामुळे एसटी बसेस पुन्हा सुरू
- Weather Update | पुढील 2 दिवस ‘या’ भागात पाऊस पडण्याची शक्यता; पाहा हवामान अंदाज
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











