🕒 1 min read
Manoj Jarange | टीम महाराष्ट्र देशा: मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळवून देण्यासाठी अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू केलं होतं.
आरक्षण मिळाल्याशिवाय मागे हटणार नसल्याचं मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलं होतं. याच पार्श्वभूमीवर काल राज्य सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी उपोषण स्थळी दाखल झालं होतं.
त्यानंतर त्यांनी केलेल्या विनंतीवरून मनोज जरांगे यांनी आपलं उपोषण स्थगित केलं आहे. त्याचबरोबर मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देण्यासाठी मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला 24 डिसेंबर पर्यंत मुदत दिली आहे.
त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बातचीत करत असताना मनोज जरांगे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत कोणतीही नोकरी भरती करू नका, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.
Manoj Jarange commented on Maratha Reservation
प्रसार माध्यमांशी बातचीत करत असताना मनोज जरांगे म्हणाले, “राज्य सरकारला मी आणखीन एक अट घातली आहे. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळणार नाही तोपर्यंत एकही नोकरी भरती करायची नाही, असं मी राज्य सरकारला सांगितलं आहे.
राज्य सरकारने आमची ही मागणी मान्य केली आहे. जर या दरम्यान राज्य सरकारने कोणतीही भरती केली तर ते मराठा समाजासाठी जागा राखीव ठेवणार आहे. त्यांनी जर राखीव जागा ठेवल्या तर मराठा समाजाला एक प्रकारचं आरक्षण (Maratha Reservation) मिळेल.”
Devendra Fadnavis commented on Manoj Jarange
दरम्यान, राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने केलेल्या विनंतीनंतर मनोज जरांगे यांनी नवव्या दिवशी आपलं उपोषण मागे घेतलं आहे. त्यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर मराठा आंदोलन शांत झालं आहे.
याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मराठा आरक्षणासाठी गेल्या 9 दिवसांपासून उपोषणाला बसलेले श्री मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण मागे घेतल्याबद्दल राज्य सरकारच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो.
या प्रक्रियेत माजी न्यायमूर्ती न्या. सुनील शुक्रे आणि न्या. मारोती गायकवाड यांनी राज्य सरकारला बहुमूल्य सहकार्य केले, मी त्यांचे विशेष आभार मानतो. माझ्या सर्व सहकारी मंत्री आणि लोकप्रतिनिधी यांचेही आभार!”
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadnavis | फडणवीस-जरांगे आमने-सामने; मनोज जरांगेंनी उपोषण सोडल्यावर देवेंद्र फडणवीस म्हणतात…
- Manoj Jarange | उपोषण मागे घेतल्यानंतर मनोज जरांगे रुग्णालयात दाखल; पाहा जरांगेंची हेल्थ अपडेट
- Maratha Reservation | नागरिकांना दिलासा; मनोज जरांगेंनी उपोषण मागे घेतल्यामुळे एसटी बसेस पुन्हा सुरू
- Weather Update | पुढील 2 दिवस ‘या’ भागात पाऊस पडण्याची शक्यता; पाहा हवामान अंदाज
- Maratha Reservation | मराठा समाजाला मुस्लिम समाजाचा पाठिंबा; मालेगावमध्ये मुस्लिम लोकांनी केलं उपोषण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











