Share

‘बॉम्बे’ महाराष्ट्राचं शहर नाही? भाजप नेत्याच्या वक्तव्याने मुंबईत आगडोंब; विरोधकांच्या हाती आयतं कोलीत!

मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ‘बॉम्बे इज नॉट महाराष्ट्र सिटी’ या भाजप नेत्याच्या विधानाने मोठा वाद पेटला आहे. यामुळे विरोधकांना भाजपला घेरण्याची आयती संधी मिळाली आहे.

Published On: 

Kripashankar Singh U-Turn: Says Mumbai Mayor Must Be Marathi Hindu

🕒 1 min read

मुंबई – मुंबई कोणाची? हा प्रश्न विचारला तरी सामान्य मराठी माणसाचं रक्त सळसळतं, पण नेमकी निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या एका बड्या नेत्याने याच विषयाला हात घालत आगीत तेल ओतण्याचं काम केलंय. तमिळनाडू भाजपचे फायरब्रँड नेते के. अण्णामलाई (K Annamalai) मुंबईत प्रचाराला आले आणि त्यांनी “बॉम्बे इज नॉट महाराष्ट्र सिटी” (बॉम्बे हे महाराष्ट्राचं शहर नाही) असे अकलेचे तारे तोडल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

बीएमसी निवडणुकीसाठी (BMC Election 2026) भाजपने कंबर कसली असून परप्रांतीय मतदारांना आकर्षित करण्यासाठी अण्णामलाई यांना मैदानात उतरवलं आहे. प्रभाग क्रमांक 47 मध्ये प्रचार करताना त्यांनी ‘ट्रिपल इंजिन सरकार’ची वकिली केली. पण जोशात बोलताना त्यांचा तोल सुटला. ते म्हणाले, “मुंबई हे महाराष्ट्राचं शहर नाही, तर ते एक आंतरराष्ट्रीय शहर आहे.” त्यांच्या या विधानामुळे ‘मराठी अस्मिते’चा मुद्दा पुन्हा एकदा पेटण्याची चिन्हे आहेत.

अण्णामलाई यांच्या मते, मुंबईचं बजेट ७५ हजार कोटींच्या घरात आहे, जे चेन्नई (८ हजार कोटी) आणि बंगळुरू (१९ हजार कोटी) पेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. त्यामुळे इथे विकासासाठी केंद्रात मोदी, राज्यात फडणवीस आणि पालिकेत भाजपचाच महापौर हवा, असं गणित त्यांनी मांडलं.

इतकेच नाही तर, या विधानामुळे आता विरोधकांना भाजपला झोडपण्याची आयती संधी मिळाली आहे. ठाकरे गटाचे नेते अखिल चित्रे यांनी यावर सडकून टीका केली आहे. “अखेर भाजपच्या पोटात होतं ते ओठावर आलंच,” असा टोला त्यांनी लगावला.

दुसरीकडे, मनसेचा ‘खळळ-खट्याक’ आधीच सुरू झाला आहे. नुकतेच राज ठाकरेंनी नाराजी व्यक्त करताच मनसैनिकांनी ठाण्यातील ‘बॉम्बे ढाबा’चा बोर्ड तोडला होता. अशातच आता अण्णामलाई यांनी थेट मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं करणारं विधान केल्याने, हा वाद आता फक्त शब्दांपुरता मर्यादित राहणार की रस्त्यावर उतरणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

भाजप दक्षिण भारतीय मतांसाठी प्रयत्न करत असताना, अण्णामलाईंच्या या एका विधानाने मराठी मतदारांना दुखावून ‘आपल्याच पायावर धोंडा’ पाडून घेतलाय का? अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या

⚠️ बातमी पूर्ण दिसत नाहीये?

चांगल्या अनुभवासाठी Chrome/Safari मध्ये उघडा.

👉 Chrome मध्ये उघडा (Click Here)