🕒 1 min read
Ind vs NZ- वर्षाची सुरुवात विजयाने झाली तर पुढचा प्रवास सुसाट होतो, असं म्हणतात. टीम इंडियाने (Team India) २०२६ ची सुरुवात अगदी तशीच ‘दणक्यात’ केली आहे. वडोदऱ्याच्या मैदानात श्वास रोखून धरायला लावणाऱ्या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा (New Zealand) ४ गडी राखून पराभव केला. या विजयासह भारताने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे, पण चर्चा मात्र ‘किंग कोहली’च्या हुकलेल्या शतकाचीच जास्त रंगली आहे.
IND vs NZ 1st ODI: Virat Kohli’s 93, Harshit Rana, KL Rahul
विराटची ‘विराट’ कामगिरी
३०१ धावांचं तगडं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या भारताची सुरुवात कर्णधार शुभमन गिल (५६) आणि रोहित शर्माने सावध केली. रोहित (२६) लवकर माघारी परतला, पण त्यानंतर मैदानात आलेल्या विराट कोहलीने (Virat Kohli) सूत्रं हाती घेतली. विराटने चौफेर फटकेबाजी करत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २८,००० धावांचा टप्पा पार करून इतिहास रचला. विराट आज शतक ठोकणार, असं वाटत असतानाच तो ९३ धावांवर बाद झाला आणि संपूर्ण स्टेडिअममध्ये सन्नाटा पसरला.
हर्षित राणाने फिरवली मॅच
विराट आणि श्रेयस अय्यर (४९) बाद झाल्यानंतर सामना किवींच्या बाजूने झुकतोय की काय, अशी भीती वाटू लागली होती. रवींद्र जडेजाही (४) फेल गेला. पण ऐन मोक्याच्या वेळी हर्षित राणाने २९ धावांची आक्रमक खेळी करत सामन्याचं चित्रच पालटलं. अखेर के.एल. राहुलने आपल्या अनुभवाचा वापर करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.
तत्पूर्वी, न्यूझीलंडने डॅरिल मिचेल (८४) आणि हेन्री निकोल्स (६२) यांच्या दमदार खेळीच्या जोरावर ३०० धावांचा डोंगर उभा केला होता. भारतीय गोलंदाजांनी मधल्या षटकांत कमबॅक केलं, पण मिचेलच्या फटकेबाजीने भारताचं टेन्शन वाढवलं होतं. मात्र, अखेर फलंदाजांनी ही ‘कसोटी’ पार करत वडोदऱ्यात भारतीय वाघांची डरकाळी फोडली.
📌 महत्वाच्या बातम्या
- “दाखव रे तो फोटो…”; आदित्य ठाकरेंनी पुन्हा केली फडणवीसांची ‘मिमिक्री’, शिवाजी पार्कवर हास्याचे फवारे!
- ‘अरे भडव्या, तुझा संबंध काय?’; राज ठाकरेंचा भाजपच्या ‘रसमलाई’वर तोफखाना, अदानींची पोलखोल!
- सोन्याने मोडले सर्व रेकॉर्ड, २०२५ मध्ये ६५% उसळी! आता २०२६ मध्ये काय होणार? तज्ज्ञ म्हणतात…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now










