Hyundai Creta EV : भारतीय बाजारात गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेचा विषय ठरलेल्या Hyundai Creta EV बाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. या अपडेटनुसार इंडिया मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2025 (India Mobility Global Expo 2025) च्या पहिल्या दिवशी म्हणजेच 17 जानेवारी रोजी ह्युंदाई क्रेटा इलेक्ट्रिक समोर येणार आहे.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ही इलेक्ट्रिक कार एका चार्जमध्ये तब्बल 450 किमी रेंज देणार आहे. तर आता या कारची किंमत देखील समोर येत आहे. मीडिया रेपोर्टसनुसार भारतीय बाजारपेठेत या कारची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 15 लाख रुपये असू शकते.
ह्युंदाईचे सीओओ तरुण गर्ग यांनी कंपनीच्या आगामी क्रेटा इलेक्ट्रिकच्या किंमतीबद्दल काही हिंट दिली आहे. त्यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले की, कंपनी क्रेटा इलेक्ट्रिकची किंमत 15 लाख ते 25 लाख रुपयांच्या दरम्यान ठेवू शकते. भारतीय बाजारात या किमतीच्या आसपास बहुतेक कॉम्पॅक्ट इलेक्ट्रिक एसयूव्ही विकले जात आहे. त्यामुळे इतर इलेक्ट्रिक कार्सना टक्कर देण्यासाठी कंपनी आपली इलेक्ट्रिक कार कमी किमतीमध्ये बाजारात लाँच करू शकते.
सध्या 50.3 किलोवॅट क्षमतेच्या बॅटरी पॅकसह एमजी झेडएस ईव्ही ही भारतीय बाजारपेठेत उपलब्ध असलेली सर्वात परवडणारी इलेक्ट्रिक एसयूव्ही आहे, ज्याची एक्स-शोरूम किंमत 16.5 लाख रुपये आहे. तर 45 किलोवॅट क्षमतेच्या बॅटरी पॅकसह टाटा कर्व्हची एक्स-शोरूम किंमत 17.5 लाख रुपये आहे. तर, 59 किलोवॅट क्षमतेच्या बॅटरी पॅकसह महिंद्रा बीई 6 ची एक्स-शोरूम किंमत 18.6 लाख रुपये आहे. ह्युंदाई क्रेटा इलेक्ट्रिक 45 किलोवॅट आणि 51.4 किलोवॅट बॅटरी पॅकसह लाँच केली जाणार आहे.
Hyundai Creta EV Features
ह्युंदाई क्रेटा इलेक्ट्रिकमध्ये कंपनीकडून फास्ट टॉर्क आणि उत्कृष्ट स्पीड देण्यात येणार आहे. ही कार 171 पीएस पॉवरवर रेट केलेली आहे. त्यामुळे ही कार फक्त 7.9 सेकंदात 100 किलोमीटर प्रति तासाचा वेग गाठू शकते. तसेच या कारमध्ये अनेक जबरदस्त फीचर्स देखील देण्यात येणार आहे. त्यापैकी एक फिचरमध्ये ग्राहकांना या कारमध्ये जास्त स्टोरेज ठेवता येणार आहे. माहितीनुसार, ही कार 433 लीटरवर बूट स्पेससह लाँच होणार आहे. तसेच या कारमध्ये ग्राहकांना डिजिटल की फिचर देखील मिळणार आहे.
महत्वाच्या बातम्या :