Share

“नार्वेकरांनी ‘मवाली’सारखी दमदाटी केली, त्यांच्यावर गुन्हा दाखल कराच!”; काँग्रेसचा एल्गार, राष्ट्रपतींकडेही केली मोठी मागणी

Congress State President Harshvardhan Sapkal demands an FIR against Speaker Rahul Narwekar

Published On: 

Harshvardhan Sapkal demands an FIR against Speaker Rahul Narwekar

🕒 1 min read

मुंबई – विधानसभा अध्यक्ष हे पद संविधानात्मक आणि अतिशय सन्मानाचं असतं. पण, याच पदावर बसलेली व्यक्ती जर रस्त्यावरच्या गुंडासारखी वागत असेल तर? असा तिखट सवाल करत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांच्यावर तोफ डागली आहे. “राहुल नार्वेकर यांच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे,” अशी आक्रमक मागणी करत सपकाळांनी भाजप आणि निवडणूक आयोगाचे वाभाडे काढले आहेत.

Harshvardhan Sapkal demands an FIR against Rahul Narwekar

महापालिका निवडणुकांच्या रणधुमाळीत कुलाबा प्रकरणावरून राजकारण चांगलंच तापलं आहे. सपकाळ यांनी अत्यंत गंभीर आरोप करताना शब्दांची मर्यादा ओलांडली. ते म्हणाले, “नार्वेकर हे ‘अधर्मी’ आहेत, त्यांच्या कपाळावर करंटेपणा गोंदवला गेलाय. त्यांनी पक्षांतर बंदी कायद्याचा वापर करून सत्तेला मदत केली आणि संविधानाचा ‘मर्डर’ केला.” कुलाबा येथे अर्ज भरताना नार्वेकरांनी अधिकाऱ्यांवर दबाव टाकला आणि दुपारी ४ नंतरचे सीसीटीव्ही फुटेज गायब केले, असा खळबळजनक दावाही सपकाळांनी केला आहे.

“निवडणूक आयोग सध्या ‘सैराट’ सुटलंय. आम्ही तक्रार केली की ते पुरावे मागतात. टोकन देऊनही अर्ज स्वीकारले नाहीत, अधिकारी दोषी असूनही आयोग गप्प का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. भाजपने ‘बाप बडा ना भैय्या, सबसे बडा रुपया’ हा तमाशा मांडला असून घोडेबाजार सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.

सपकाळांनी थेट राष्ट्रपतींना साकडं घातलं आहे. “आर्थिक आणि संविधानात्मक भ्रष्टाचार करणाऱ्या नार्वेकरांना राष्ट्रपतींनी तात्काळ बडतर्फ करावं, कारण ते ‘चिप’ (Cheap) वर्तन करत आहेत,” असं म्हणत काँग्रेसने आता या लढाईत आरपारची भूमिका घेतली आहे. १५ जानेवारीला होणाऱ्या मतदानात जनता या ‘पैशांच्या खेळाला’ काय उत्तर देते, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या

⚠️ बातमी पूर्ण दिसत नाहीये?

चांगल्या अनुभवासाठी Chrome/Safari मध्ये उघडा.

👉 Chrome मध्ये उघडा (Click Here)