🕒 1 min read
पुणे (Gold Rate 2026) – तुमच्याकडे सोनं आहे का? असेल तर तुम्ही मालामाल झाला आहात! २०२५ हे वर्ष सोन्याच्या गुंतवणूकदारांसाठी अक्षरशः ‘सुवर्णकाळ’ ठरलंय. गेल्या ५० वर्षांचा इतिहास पाहिला, तर सोन्याने कधी नव्हे ती सर्वोत्तम कामगिरी नोंदवली आहे. २०२५ मध्ये सोन्याच्या दरात तब्बल ६५ टक्क्यांची ऐतिहासिक वाढ झाली आहे. पण, आता २०२६ मध्ये काय होणार? सोन्याची ही झळाळी अशीच राहणार की भाव पडणार? याबाबत जागतिक तज्ज्ञांनी मोठा दावा केला आहे.
Gold Rate 2026 Prediction
२०२६ मध्ये तेजी की मंदी?
ब्लूमबर्गने (Bloomberg) नुकतीच जगभरातील बड्या फंड मॅनेजर्ससोबत चर्चा केली. यातील बहुतांश तज्ज्ञांनी एकच सूर लावलाय “सोनं विकू नका, होल्ड करा.” २०२६ मध्येही सोन्यातील तेजी कायम राहण्याची दाट शक्यता आहे. फिडेल्टी इंटरनॅशनलचे पोर्टफोलिओ मॅनेजर इयान सॅमसन यांच्या मते, जगभरातील व्याजदर कमी होत आहेत आणि राजकोषीय तूट वाढत आहे, हे घटक सोन्याच्या पथ्यावर पडणार आहेत.
मध्यवर्ती बँकांचा ‘गोल्ड रश’ सोनं वाढण्यामागे सर्वात मोठं कारण म्हणजे जगातील मध्यवर्ती बँका. गोल्डमॅन सॅक्सच्या (Goldman Sachs) रिपोर्टनुसार, २०२६ मध्ये मध्यवर्ती बँका दर महिन्याला तब्बल ८० टन सोने खरेदी करू शकतात. विशेषतः रशियावरील निर्बंधांनंतर (US Sanctions) अनेक देशांचा डॉलरवरील विश्वास डगमगला आहे, त्यामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून देशांचे सरकारच सोनं साठवत आहेत.
गुंतवणूकदारांनी काय करावे?
मॉर्गन स्टॅनलीचे (Morgan Stanley) मुख्य रणनीतीकार माइक विल्सन यांनी गुंतवणूकदारांना मोलाचा सल्ला दिलाय. ते म्हणतात, “सध्याची जागतिक परिस्थिती पाहता, तुमच्या पोर्टफोलिओमध्ये किमान २० टक्के वाटा हा सोन्यासारख्या ‘रिअल असेट्स’चा असावा.” थोडक्यात काय, तर जोपर्यंत जगात भूराजकीय तणाव आणि युद्धाचे ढग आहेत, तोवर सोन्याचा भाव ‘तेजीत’च राहण्याची चिन्हे आहेत.
📌 महत्वाच्या बातम्या
- Share Market Crash: शेअर बाजारात होळी; ३.६३ लाख कोटी स्वाहा! ‘या’ कंपनीला मोठा फटका
- सुपरहिरो की संवेदना? मुंबईच्या आखाड्यात भाजपचा ‘हायटेक’ डाव, तर ठाकरेंची ‘ही’ चाल!
- “शिवरायांनी सुरत लुटली, तो राग आजही काहींच्या मनात…”; जयंत पाटलांचा भाजपवर घणाघात!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now










