Share

तेजश्री प्रधाननंतर आता ‘नॅशनल क्रश’ घेणार मुख्यमंत्र्यांची ‘शाळा’; पुण्यात होणाऱ्या ‘त्या’ मुलाखतीची जोरदार चर्चा!

ठाण्यात तेजश्री प्रधाननंतर आता पुण्यात ‘नॅशनल क्रश’ गिरीजा ओक मुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीसाठी सज्ज झाली आहे. भाजपचा हा नवा ‘सेलिब्रिटी पॅटर्न’ आणि पुण्यात होणारा हा कार्यक्रम सध्या चर्चेचा विषय ठरलाय.

Published On: 

Devendra Fadnavis Interview: तेजश्री नाही, आता गिरीजा ओक विचारणार प्रश्न!

🕒 1 min read

पुणे – निवडणुकीच्या आखाड्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी तर नेहमीच झडत असतात, पण यंदा भाजपने प्रचाराचा एक वेगळाच फंडा शोधून काढलाय की काय? असा प्रश्न सध्या उपस्थित होतोय. राज्यभरात महापालिका निवडणुकांचा धुरळा उडत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या ‘इमेज बिल्डिंग’च्या एका नव्या पॅटर्नची सध्या जोरदार चर्चा आहे. राजकीय नेत्यांच्या मुलाखती पत्रकारांनी घेणे आता जुने झाले, आता थेट लोकप्रिय अभिनेत्रीच नेत्यांना प्रश्न विचारू लागल्या आहेत!

काही दिवसांपूर्वीच ठाण्यात ‘होणार सून मी या घरची’ फेम अभिनेत्री तेजश्री प्रधानने ‘आपलं ठाणे, आपले देवाभाऊ’ कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांची मुलाखत घेतली होती. तिने विचारलेले मुंबईकरांचे प्रश्न आणि त्याला मुख्यमंत्र्यांनी दिलेली उत्तरे सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली. ठाण्याच्या यशानंतर हाच पॅटर्न आता पुण्यात राबवला जाणार आहे.

Devendra Fadnavis Interview

देशभरातील तरुणाईची ‘नॅशनल क्रश’ आणि आपल्या साध्या पण आकर्षक लूकने घायाळ करणारी अभिनेत्री गिरीजा ओक (Girija Oak) आता थेट देवाभाऊंची मुलाखत घेणार आहे. पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने ‘संवाद पुणेकरांशी’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. रविवार, ११ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता एरंडवणे येथील शुभारंभ लॉन्समध्ये हा सोहळा रंगणार आहे.

कुठल्याही राजकीय सभेत गर्दी खेचण्यासाठी सेलिब्रिटींचा वापर ही काही नवीन गोष्ट नाही, पण भाजपने यंदा थेट मुलाखतीसाठी लोकप्रिय अभिनेत्रींची निवड करून मतदारांना आकर्षित करण्याची ‘स्मार्ट खेळी’ खेळली आहे. याआधी महेश कोठारे आणि निवेदिता सराफ यांनी भाजपला पाठिंबा दिला होताच. इतकेच नाही तर, तेजश्री आणि आता गिरीजा यांच्या माध्यमातून महिला आणि तरुण मतदारांशी कनेक्ट होण्याचा हा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे. आता गिरीजा ओक पुणेकरांच्या वतीने कोणते तिखट प्रश्न विचारणार आणि मुख्यमंत्री त्याला कसं उत्तर देणार, याकडे संपूर्ण पुण्याचे लक्ष लागले आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या

⚠️ बातमी पूर्ण दिसत नाहीये?

चांगल्या अनुभवासाठी Chrome/Safari मध्ये उघडा.

👉 Chrome मध्ये उघडा (Click Here)