🕒 1 min read
पुणे – राजकारणात शब्दांचे वार कधी कोणाच्या जिव्हारी लागतील आणि त्यातून काय नवा अंक सुरू होईल, हे सांगता येत नाही. याचाच प्रत्यय सध्या Pimpri-Chinchwad मध्ये येतोय. पिंपरीच्या आखाड्यात सध्या अजित पवार विरुद्ध महेश लांडगे असा ‘सामना’ रंगलेला असतानाच, आता मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी यात एन्ट्री घेतली आहे. नुसती एन्ट्रीच नाही, तर एका शायरीतून त्यांनी अजितदादांचा समाचार घेतला आणि आपल्याच आमदाराचे कानही टोचले आहेत.
अजित पवार आणि भाजप आमदार महेश लांडगे (Mahesh Landge) यांच्यातील वाद सध्या विकोपाला गेला आहे. लांडगेंनी “आम्ही काय बांगड्या भरल्या नाहीत, जन्मत:च लंगोट घालणारे आम्ही आहोत,” अशा शेलक्या शब्दांत दादांना चॅलेंज दिलं होतं. यावर फडणवीसांनी पिंपरीत एका प्रचार सभेत बोलताना आपली स्टाईल दाखवून दिली. “आमचे महेश लांडगे जरा वैतागले होते. पण दादा, तुम्ही शांत राहा,” असा सल्ला देत फडणवीसांनी थेट शायरीचा आधार घेतला.
फडणवीसांनी अजित पवारांचं नाव न घेता खोचक टोला लगावला. ते म्हणाले, “परिंदे को मिलेगी मंजिल एकदिन, ये उनके फैले हुये पंख बोलते है! और वही लोग जो खामोश रहते है, अक्सर जमाने मे जिनके हुनर बोलते है!!” या चार ओळींतून फडणवीसांनी स्पष्ट केलं की, आमचं काम बोलतंय, त्यामुळे विरोधकांचा हा त्रागा आणि राग आहे. “त्यांना सांगायला काहीच काम नाही, म्हणून ते तुम्हाला आरोपांच्या जाळ्यात अडकवू पाहत आहेत,” असं सांगत फडणवीसांनी लांडगेंना संयम राखण्याचा सल्ला दिला. “महेश दादा, तुम्ही टीका करू नका, फक्त कामांची आठवण करून द्या,” असंही ते म्हणाले.
“एसआरएचा बॉस मीच…”
केवळ शायरीच नाही, तर SRA च्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या वाकयुद्धावरही फडणवीसांनी पडदा टाकला. महेश लांडगेंना कोणीतरी एसआरएवरून धमकी देत असल्याचा मुद्दा समोर आला होता. यावर बोलताना मुख्यमंत्री कडाडले, “इथं कायद्याचं राज्य चालेल, धमकीचे नाही. आणि मुळात एसआरएचा अध्यक्ष मीच आहे.” १६ जानेवारीनंतर योग्य ती कारवाई करू, असा इशारा देत फडणवीसांनी पिंपरीत भाजपची हवा आणखी गरम केली आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- “निवडणुकीत पडलात, तरी माज जाईना”; ठाकरेंनी दानवेंची ‘ती’ गोष्ट काढली, सभेत शिट्ट्यांचा पाऊस!
- ‘बाळासाहेबांनी वाचवलं नसतं तर मोदी दिसले नसते…’; उद्धव ठाकरे भावूक, पण डोळ्यातील ‘त्या’ पाण्याचं सत्य काय?
- १५ तासांचा ‘हायव्होल्टेज ड्रामा’ संपला; डॉ. संग्राम पाटील अखेर सुटले! ‘या’ एका गोष्टीमुळे टळली अटक?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now










