Share

‘हात पिरगळला, गळा दाबला…’; नवी मुंबईत भाजप कार्यकर्त्यांनी शिंदे सैनिकाला चोपलं! VIDEO व्हायरल

नवी मुंबईत पैसे वाटपाच्या संशयावरून भाजप कार्यकर्त्यांनी शिंदे गटाच्या एका कार्यकर्त्याला बेदम मारहाण केली असून, गळा दाबल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Published On: 

Navi Mumbai Rada: Beat Eknath Shinde sena worker

🕒 1 min read

नवी मुंबई- राज्यात सत्तेत एकत्र, पण गल्लीत मात्र एकमेकांचे गळे पकडतायत? असाच काहीसा धक्कादायक प्रकार नवी मुंबईत घडलाय. महापालिका निवडणुकीच्या (Navi Mumbai Election 2026) रणधुमाळीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भाजपचे गणेश नाईक (Ganesh Naik) यांच्यातील सुप्त संघर्ष आता रस्त्यावर आला आहे. कोपरखैरणे येथे भाजप कार्यकर्त्यांनी चक्क एका शिंदे सैनिकाला घेरून बेदम मारहाण केल्याची घटना घडली असून, याचा थरारक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Navi Mumbai Rada: Beat Eknath Shinde sena worker

नेमकं काय घडलं?

सोमवारी कोपरखैरणे गावात प्रचाराचा धुराळा उडत असताना, शिंदे गटाचा एक कार्यकर्ता मतदारांना पैसे वाटत असल्याचा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केला. संशयावरून सुरू झालेला हा वाद हाणामारीपर्यंत गेला. व्हायरल व्हिडीओमध्ये भाजपच्या जमावाने या कार्यकर्त्याला चहूबाजूने घेरल्याचे स्पष्ट दिसत आहे.

थरारक व्हिडीओ: ‘मला मारू नका…’

परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली होती की, भाजप कार्यकर्त्यांनी शिंदे सेनेच्या त्या कार्यकर्त्याचे दोन्ही हात मागे पिरगळून धरले होते. त्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण सुरू होती. इतकंच नाही, तर एकाने थेट त्याचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला. तो कार्यकर्ता “मला मारू नका” अशी वारंवार विनवणी करत होता. त्याने मदतीसाठी कोणालातरी फोन लावण्याचा प्रयत्न केला, पण जमावाने त्याचा मोबाइलही हिसकावून घेतला. एकटा कार्यकर्ता भाजपच्या या फौजेसमोर हतबल झालेला व्हिडीओत दिसत आहे.

या घटनेमुळे नवी मुंबईतील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. मतदानाच्या तोंडावर युतीधर्माचे तीन-तेरा वाजले असून, पोलीस या राड्यावर काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या

⚠️ बातमी पूर्ण दिसत नाहीये?

चांगल्या अनुभवासाठी Chrome/Safari मध्ये उघडा.

👉 Chrome मध्ये उघडा (Click Here)