‘नाटकं बघतोय आणि करतोय सुद्धा…’; गिरीजा ओकच्या गुगलीवर फडणवीसांचे सिक्सर

‘नाटकं बघतोय आणि करतोय सुद्धा…’, गिरीजा ओकच्या प्रश्नावर फडणवीसांची तुफान बॅटिंग; पुण्यात पिकला एकच हशा! व्हिडिओ व्हायरल.

Published On: 

Devendra Fadnavis Interview: 'नाटकं करतोय..'; CM ची टोलेबाजी

पुणे – राजकारण आणि नाटक यांचं नातं तसं जुनं आहे, पण जेव्हा राज्याचा मुख्यमंत्रीच भर कार्यक्रमात “मी नाटक करतो” अशी कबुली देतो, तेव्हा काय होईल? असाच काहीसा भन्नाट प्रकार पुण्यात घडला आहे. सध्या पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने आयोजित केलेल्या ‘संवाद पुणेकरांशी’ या कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी लावलेली हजेरी आणि तिथे झालेली फटकेबाजी सध्या सोशल मीडियावर चांगलीच गाजतेय.

‘नॅशनल क्रश’ गिरीजा ओक (Girija Oak) हिने मुख्यमंत्र्यांची मुलाखत घेतली. वातावरण हलकं-फुलकं करण्यासाठी गिरीजाने विचारलं, “तुम्हाला नाटकं किंवा सिनेमे बघायला वेळ मिळतो का?” यावर फडणवीसांनी नकारार्थी मान डोलावताच गिरीजाने राजकीय गुगली टाकली. ती मिश्कीलपणे म्हणाली, “नाही, नाटकं बघताय तुम्ही, फक्त ती आम्ही केलेली नाहीत.” यावर क्षणाचाही विलंब न लावता फडणवीसांनी उत्तर दिलं, “नाटकं बघतोय आणि करतोय सुद्धा.. आता काय सांगू?” हे वाक्य ऐकताच सभागृहात उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

Devendra Fadnavis Interview

या गप्पांमध्ये फडणवीसांनी आपल्या आवडीच्या नाटकांचाही उल्लेख केला. त्यांना भरत जाधवचं ‘सही रे सही’ प्रचंड आवडतं. इथेही त्यांनी विरोधकांना चिमटा काढण्याची संधी सोडली नाही. बालपणी पाहिलेल्या ‘तो मी नव्हेच’ (To Me Navhech) या नाटकाचा संदर्भ देत ते म्हणाले, “आता राजकारणात मला अशी अनेक लोकं भेटतात, ज्यांना जाब विचारला की ते बरोबर ‘तो मी नव्हेच’ अशी भूमिका घेतात.”

मुख्यमंत्र्यांनी यावेळी आपल्या खोडकर स्वभावाचाही खुलासा केला. एखादा सिनेमा त्यांना आवडला नाही, तर ‘फक्त मीच का सहन करू?’ या विचाराने ते मित्रांना मुद्दाम त्या सिनेमाचं तिकीट काढून देतात आणि त्यांचं ‘छळ’ करतात.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही