Author Profile
ओमराजे निंबाळकर म्हणाले— “हा निकाल दुर्दैवी”

कोर्टाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह! ओमराजे निंबाळकर म्हणाले, “हा निकाल दुर्दैवी”

20 वर्षांनंतर पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणात सर्व आरोपी निर्दोष मुक्त झाले असून, हा निकाल धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया ओमराजे निंबाळकर यांनी दिली आहे. या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात अपील करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

‘पुरावे अपुरे’ म्हणत न्यायालयाचा निर्णय; पवनराजे निंबाळकर केसचा निकाल जाहीर

पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणात अंतिम निकाल लागला आहे. पद्मसिंग पाटलांसह सर्व आरोपींची न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. या निर्णयामुळे खासदार ओमराजे निंबाळकर आणि निंबाळकर कुटुंबाला मोठा कायदेशीर धक्का बसला आहे.

पवनराजे निंबाळकर केसचा अंतिम क्षण; ओमराजेंची कोर्टात हजेरी, निकालाकडे राज्याचे लक्ष

पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणाची आज सत्र न्यायालयात महत्त्वाची सुनावणी होत असून निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. खासदार ओमराजे निंबाळकर न्यायालयात उपस्थित असून, सुनावणीच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाबाहेर शिवसैनिकांची गर्दी झाली आहे. या निर्णयाकडे धाराशिवसह संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.