🕒 1 min read
नवी दिल्ली : दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे (AAP) ज्येष्ठ नेते मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांनी WhatsApp च्या नव्या Username feature बाबत चिंता व्यक्त केली आहे. आपल्या नावाशी संबंधित बहुतांश युजरनेम आधीच आरक्षित आहे, असे दिसून आल्याने ओळख चोरी आणि सायबर फसवणुकीचा धोका वाढू शकतो, असे त्यांनी म्हटले.
WhatsApp ने अलीकडेच Username feature सादर केले आहे. या सुविधेमुळे वापरकर्त्यांना मोबाईल क्रमांक न देता इतरांशी संपर्क साधता येणार आहे. मात्र, या फीचरमुळे बनावट खाती आणि प्रसिद्ध व्यक्तींच्या नावाचा गैरवापर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मनीष सिसोदिया यांनी त्यांच्या अधिकृत X अकाउंटवरून सांगितले की, त्यांनी स्वतःचे Username आरक्षित करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या नावाशी संबंधित अनेक पर्याय आधीच उपलब्ध नसल्याचे दिसून आले.
त्यांच्या म्हणण्यानुसार, Manish Sisodia AAP, Manish_Sisodia_AAP तसेच ‘आप’सोबत जोडलेले अनेक युजरनेम आधीच आरक्षित असल्याचे दिसले. त्यामुळे अशा नावांचा गैरवापर होऊन लोकांची दिशाभूल होण्याची शक्यता असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर सिसोदिया यांनी Meta आणि WhatsApp यांना मजबूत व्हेरिफिकेशन प्रणाली लागू करण्याची मागणी केली. यामुळे प्रसिद्ध व्यक्तींच्या नावाचा गैरवापर रोखता येईल आणि वापरकर्त्यांची फसवणूक टाळता येईल, असे त्यांनी म्हटले.
दरम्यान, WhatsApp ने या प्रकरणावर स्पष्टीकरण देताना सांगितले की, प्रसिद्ध व्यक्ती, सरकारी संस्था आणि Meta Verified खात्यांशी संबंधित युजरनेम आधीच सुरक्षित ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे केवळ संबंधित अधिकृत खातेधारकांनाच त्या नावांवर दावा करता येईल. कंपनीने हेही स्पष्ट केले की, लोकप्रिय नावांवर कोणीही मनमानी पद्धतीने दावा करू शकत नाही. वर्षाअखेरीस Username फीचर सर्वांसाठी उपलब्ध होण्यापूर्वीच आरक्षण प्रक्रिया सुरू करण्यात आली असून वापरकर्त्यांच्या अभिप्रायानुसार त्यात आवश्यक सुधारणा केल्या जातील.
📌 महत्वाच्या बातम्या
- धक्कादायक! साकीनाक्यात उघड्या मॅनहोलमध्ये व्यक्ती पडली; छत्री-चप्पल सापडली, रेस्क्यू ऑपरेशन सुरू
- ‘हे फडणवीसांचे मुख्यमंत्री म्हणून शेवटचे अधिवेशन’; आदित्य ठाकरेंचा मोठा दावा
- Mahila Shetkari Sashaktikaran Bill 2026 : महिला शेतकऱ्यांना मिळणार स्वतंत्र ओळख! सरकारची मोठी घोषणा













