Share

धक्कादायक! साकीनाक्यात उघड्या मॅनहोलमध्ये व्यक्ती पडली; छत्री-चप्पल सापडली, रेस्क्यू ऑपरेशन सुरू

मुंबईतील साकीनाका परिसरात उघड्या मॅनहोलमध्ये पडलेल्या 45 वर्षीय व्यक्तीचा शोध सुरू असून घटनास्थळी फक्त छत्री आणि चप्पल आढळल्याने चिंतेचे वातावरण आहे.

Published On: 

Open Manhole

मुंबई : राज्यभर मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून मुंबईतही (Mumbai) पावसामुळे (Rain) अपघातांची मालिका सुरूच आहे. चेंबूरमधील (Chembur) शाळेच्या बसवर झाड कोसळण्याच्या घटनेनंतर आता साकीनाका परिसरात उघड्या मॅनहोलमध्ये एक व्यक्ती पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

साकीनाका येथील खैराणी रोडवरील सन्मान हॉटेलजवळ खासगी कंत्राटदाराकडून देखभाल काम सुरू असल्याने मॅनहोलचे झाकण उघडे ठेवण्यात आले होते. याचदरम्यान मोबाईलवर बोलत असलेली एक व्यक्ती उघड्या मॅनहोलमध्ये पडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

शोधमोहीमेदरम्यान संबंधित व्यक्तीची छत्री आणि चप्पल घटनास्थळी आढळून आली. मात्र, पाण्याचा प्रवाह प्रचंड असल्यामुळे संबंधित व्यक्ती वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल (MFB), पोलीस, 108 रुग्णवाहिका आणि संबंधित विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. सुमारे 45 वर्षीय अस्लम अन्सारी (Aslam Ansari) यांचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर रेस्क्यू ऑपरेशन सुरू असून प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही