Congress | “फॉर्म मिळाल्यानंतर सत्यजीत तांबेंनी ‘OK’ उत्तर पाठवलं होतं”; काँग्रेसने सादर केले पुरावे 

Congress | मुंबई : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत विजयी झाल्यानंतर आज काँग्रेस नेते सत्यजीत तांबे यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. या पत्रकार परिषदेमध्ये सत्यजीत तांबे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

“नाशिक पदवीधरसाठी अर्ज भरण्याच्या एक दिवस आधी प्रदेश कार्यालयाकडून चुकीचे एबी फॉर्म देण्यात आला. एबी फॉर्म हा मुद्दा लहान-सहान नाही, चुकीचा फॉर्म देऊन माझ्या कुटुंबाची बदनामी करण्याचा आणि बाळासाहेब थोरातांना बदनाम करण्याचा पक्षाचा डाव होता”, असा गंभीर आरोप सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांनी केला आहे.”

Atul Londhe Answered Satyajeet Tambe

यावर आता काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी प्रतिक्रिया देत पुरावे देखील सादर केले आहेत. सत्यजित तांबेंना दिलेला अर्ज योग्यच होता, असं अतुल लोंढे (Atul Londhe) यांनी म्हंटल आहे. पुरावा म्हणून त्यांनी व्हॉट्सअॅपवर झालेल्या चॅटींगचा एक स्क्रीनशॉट सादर केला आहे. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन संबंधित आरोप फेटाळून लावले आहेत.

ते म्हणाले, “सत्यजीत तांबे यांनी आरोप केला की,अमरावती आणि नागपूरचे एबी फॉर्म दिले होते. पण त्यांना जे फॉर्म पाठवले होते, ते फॉर्म बाळासाहेब थोरात यांचे सहकारी सचिन गुंजाळ यांच्याद्वारे पाठवले होते. त्याचे स्क्रीनशॉटही त्यांना पाठवले होते, व्हॉट्सअॅपवर त्यांचा ‘ओके’ असा रिप्लाय आला आहे, हे कोरे एबी फॉर्म आहेत, याचे पुरावे आमच्याकडे आहेत.”

सत्यजीत तांबे काय म्हणाले?

“नाशिक पदवीधरसाठी अर्ज भरण्याच्या एक दिवस आधी प्रदेश कार्यालयाकडून चुकीचे एबी फॉर्म देण्यात आला. एबी फॉर्म हा मुद्दा लहान-सहान नाही, चुकीचा फॉर्म देऊन माझ्या कुटुंबाची बदनामी करण्याचा आणि बाळासाहेब थोरातांना बदनाम करण्याचा पक्षाचा डाव होता”, असा गंभीर आरोप सत्यजीत तांब यांनी केला आहे. “माझ्यावर भाजपचा पाठिंबा घेतल्याचा आरोप करण्यात आला, पण चुकीचा एबी फॉर्म देण्याच्या मुद्द्यावर नाना पटोले यांनी का खुलासा केला नाही” असा सवाल सत्यजीत तांबे यांनी केला आहे.

“मागील महिनाभराच्या काळात आमच्या कुटुंबावर अनेक आरोप प्रत्यारोप झाले. आमचं कुटुंब सुरुवातीपासून काँग्रेस पक्षात आहे. 2030 मध्ये आमच्या कुटुंबाला काँग्रेस पक्षात येऊन 100 वर्षे होतील. आम्ही पक्षासाठी निष्ठेनं काम केलं. विविध आव्हानात्मक परिस्थितीत आम्ही काम केलं. युवक काँग्रेससाठी काम करताना माझ्यावर 50 पेक्षा अधिक गुन्हे दाखल झाले आहेत. यामुळे मला पासपोर्टही मिळत नव्हता. मी चळवळीतून पुढे आलेला कार्यकर्ता आहे.”, असे सत्यजीत तांबे म्हणाले आहेत.

“पण जेव्हा मी आमचे पक्षश्रेष्ठी एच के पाटील यांना भेटून मला संधी द्या, असं सांगितलं. मला संघटनेत एखादं पद किंवा जबाबदारी मागितली होती. पण दुर्दैवाने तसं झालं नाही. तुम्ही तुमच्या वडिलांच्या जागेवर विधान परिषदेची निवडून लढा असं सांगण्यात आलं, असं जेव्हा एच के पाटील बोलले तेव्हा मला प्रचंड संताप आला. तेव्हा मी त्यांना सांगितलं की, माझ्या वडिलांच्या जागेवर जर मला निवडणूक लढवायची असती, तर मी 22 वर्षे संघटनेसाठी जे काम केलं, हा विचार वाढवण्याचं काम केलं. मला पक्षाने किंवा संघटनेनं काहीतरी द्यावं, अशी मानसिकता आहे, वडिलांच्या जागी निवडणूक लढवावी, अशी माझी मानसिकता नाही, हे मी स्पष्टपणे त्यांना सांगितलं, पण दुसरी कुठली संधी तुला देणं शक्य नाही, तू वडिलांच्या जागी प्रयत्न कर, असा सल्ला ते मला देऊ लागले, याला माझा पूर्णपणे विरोध होता,” असे सत्यजित तांबेंनी सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या :